पक्षी निरीक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

डोंबिवली - ठाणे आणि रायगड पक्षी निरीक्षण संघटनेतर्फे डोंबिवलीत झालेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच डोंबिवली पूर्वेकडील खासगी सभागृहात उत्साहात झाला. सांघिक स्वरूपात ही स्पर्धा झाली असून, तब्बल ५२ संघांनी स्पर्धेत  आपला सहभाग नोंदवला.

तीन गटांत झालेल्या स्पर्धेत अनुक्रमे शाहीन ससाणा संघ, पराग्रीन ससाणा संघ, कैकर संघ यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यामध्ये दुर्मिळ आढळणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण केल्याबद्दल गरुड आणि चिमणी संघ यांना विशेष पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध पक्षितज्ज्ञ अमेय केतकर, ऋजुता फडके आणि बीएनएचएस संस्थेचे राजू कासंबे उपस्थित होते. जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांचा समावेश करून किशोर वयापासून त्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही पक्षिनिरीक्षणाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही जवळच्या पक्षिनिरीक्षण स्थळांना भल्या पहाटे भेटी दिल्या. या वेळी ठाणे आणि रायगड जिल्हा पक्षिमित्र संघटनेचे सदस्य प्रशांत पाटील, हिमांशू टेंभेकर, किरण कदम, स्वप्नील कुलकर्णी, प्रतीक प्रभू, पक्षितज्ज्ञ संजय मोंगा आणि सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘वन्य’ या ॲपचे अनावरणही करण्यात आले. अमेय केतकर यांनी पक्षिनिरीक्षण आणि निसर्ग वाचनाची आवड मुलांमध्ये रुजवणे संवर्धनाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले, तर डॉ. राजू कासंबे यांनी पालकांना मुलांना अशा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

Web Title: marathi news dombivli Bird inspection thane