डीएसकेच्या सर्व मालमत्तेची माहिती सादर करण्याचे आदेश - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई - डिएसके प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुंतवणुकदांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयात आज (ता. 5 फेब्रु.) डी एस कुलकर्णी यांना पैसे जमा करण्याचा आदेश दिला होता. पण पैसे जमा करण्यास डीएसके आजही अपयशी
 ठरले. 

मुंबई - डिएसके प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुंतवणुकदांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयात आज (ता. 5 फेब्रु.) डी एस कुलकर्णी यांना पैसे जमा करण्याचा आदेश दिला होता. पण पैसे जमा करण्यास डीएसके आजही अपयशी
 ठरले. 

डी एस कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कुलकर्णी यांना 50 कोटी जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश होते. मात्र पैसे जमा न करता आल्याने आठवडाभरात डीएसकेच्या सर्व मालमत्तेची माहिती कोर्टाला सादर करावी, असे आदेश आता उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीवर न्यायालयाने ताशेरे ओढले. कुलकर्णी यांना 13 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले असून आठवडाभरात पोलिसी कारवाईची माहिती सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. 

आज न्यायालयाने डीएसकेच्या गुंतवणुकदारांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावले. तेव्हा गुंतवणूकदारांनी डीएसके यांच्या आश्वासनाबद्दल व्यथा मांडली. यावर न्यायालयाने, 'आम्ही हा खटला पुर्ण होईपर्यंत डीएसके यांना कोठडीत ठेवु शकतो, पण त्यानी गुंतवणुकदाराचे पैसे मिळणार का? अटकपूर्व जामीन रद्द करायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही, पण गुंतवणूकदारांना याने काय मिळणार? न्यायालयाची गुंतवणूकदारांशी पूर्ण सहानुभूती आहे.' असे स्पष्टीकरण दिले आहे.  

Web Title: marathi news dsk fraud investors mumbai high court