भूकंपाच्या धक्क्याने जव्हार हादरले

earthquake
earthquake

मोखाडा : जव्हार तालुक्यात चार वर्षांपूर्वी जमिनीमध्ये गूढ आवाज येऊन हादरे बसत होते. आता मागील आठवड्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. आज सकाळी 9.45 वाजता पुन्हा भूकंपाचा मागील आठवडय़ापेक्षा जोराचा धक्का बसल्याने जव्हार शहर व परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये नागरिक भयभीत होऊन मोकळ्या जागेत बाहेर आले. सुदैवाने कुठेही अघटित घटना घडलेली नाही. मात्र, जव्हार व परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली   आहेत.

जव्हार शहर तसेच लगतच्या गरदवाडी, जुनीजव्हार, काळीधोंड, कासटवाडी, यांसह 10 किमी अंतरावरचे गाव-पाडे सकाळी 9.45 वाजता भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहेत. घरांच्या छप्पराचे पत्रे, घरातील भांडी खाली कोसळल्याने नागरिक भयभीत होऊन मोकळ्या जागेत बाहेर येऊन थांबले आहेत. मात्र, सुदैवाने कुठेही नुकसान झाल्याची घटना घडली नाही. तसेच कार्यालयांना सरकारी सुट्टी असल्याने आपत्कालीन विभागाशी ही संपर्क होऊ शकला नाही.    

सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने, ठाणे, मुंबई, वसई भागातील पर्यटक बोचर्‍या थंडीची मजा लुटण्यासाठी जव्हारला आले आहेत. मात्र, आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने जव्हारच्या नागरिकांसह पर्यटकही भयभीत झाले असून ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी जमिनीमध्ये गूढ आवाज व जमीन हादरण्याच्या घटना घडल्याने, जव्हारमध्ये हनुमान पॉईंटजवळ भुगर्भ विभागाने भूकंप मापक यंत्रणा बसवली होती. मात्र, गत आठवड्यापासुन पुन्हा भूकंपाचे हादरे, बसू लागल्यानंतर प्रशासनाला भूकंप मापक यंत्राची आठवण झाली. जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी मागील आठवडय़ातील भूकंपाची तीव्रता जाणून घेण्यासाठी गेले असता, तेथील यंत्रणाच चोरीला गेल्याचे दिसून आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com