esakal | बीबीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा; पात्रता निश्चिती मुदत वाढवली
sakal

बोलून बातमी शोधा

बीबीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा; पात्रता निश्चिती मुदत वाढवली

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना गृहनिर्माण मंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. चाळीतील रहिवाशांची पात्रता निश्चितीची मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बीबीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा; पात्रता निश्चिती मुदत वाढवली

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई  : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना गृहनिर्माण मंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. चाळीतील रहिवाशांची पात्रता निश्चितीची मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे बीडीडी चाळीतील खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

म्हाडा मुख्यालयात ना. म. जोशी मार्गावरील प्रस्तावित पुनर्विकास इमारतीमध्ये पात्र भाडेकरूंना वितरित करण्याच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते. बीबीडी चाळीतील अनेक घर मालकांनी गेल्या काही वर्षांमध्ये घरांची विक्री केली आहे. घर खरेदीनंतर घरे नावावर न झाल्याने घर खरेदीदार चिंतेत होते. त्यामुळे अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी 28 जून 017 ची पात्रतेची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य केल्याने बीडीडी चाळीतील अनेक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीबीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सुरु आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यासाठी सरकारने सक्षम प्राधिकारी म्हणूसन उपजिल्हाधिकारी अतिक्रमण/ निष्कासन मुंबई शहर यांची नियुक्ती केली आहे. ना, मी जोशी मार्ग येथील 2 हजार 560 पैकी 800 भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 607 भाडेकरू पात्र ठरले आहेत. तर वरळी आणि नायगाव येथील रहिवाशांच्या पात्रतेचे कामही प्रगतीपथावर आहे.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news Extended eligibility period residents BBD Chali mumbai latest

loading image