कल्याण डोंबिवलीत 12 मार्चपासून हेल्मेट सक्ती

रविंद्र खरात 
रविवार, 4 मार्च 2018

मोटार सायकल चालविताना अपघात झाल्यास डोके सोडून इतर अवयवांना दुखापत झाल्यावर फार तर अपंगत्व येते. मात्र डोक्यातील मेंदू हा अतिशय संवेदनशील असुन जबर मार लागल्यास जीव जाण्याची शक्यता असते.

कल्याण : वाहन चालविताना नियम पाळले पाहिजे, अपघात मुक्त प्रवास, सुरक्षित प्रवास कसा करावा, डोके नसणारा मनुष्य अश्या विविध प्रबोधन करणारे उपक्रम वाहतूक पोलिसांच्या मार्फत कल्याण डोंबिवलीमध्ये राबविण्यात आले. मात्र वाहन चालकांचा काही बेशिस्तपणा संपेना, यावर नियंत्रण आणण्यासाठी सोमवार 12 मार्च 2018 पासून कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट सक्तीचे असून वाहन चालका सोबत जो सहकारी असेल त्याला ही हेल्मेट सक्तीचे असून नियम न पाळल्यास पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल अशी माहिती कल्याण डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी सकाळला दिली.

मोटार सायकल चालविताना अपघात झाल्यास डोके सोडून इतर अवयवांना दुखापत झाल्यावर फार तर अपंगत्व येते. मात्र डोक्यातील मेंदू हा अतिशय संवेदनशील असुन जबर मार लागल्यास जीव जाण्याची शक्यता असते. अश्या जबर दुखापतीपासून स्वतःचा बचाव करण्याकरीता मोटारसायकल चालविताना चालकाने आणि आणि त्याच्या सहकाऱ्याने देखील हेल्मेट बंधनकारक असून आता कल्याण डोंबिवलीमध्ये सोमवार 12 मार्चपासून सक्तीचे केले असून याचे स्वागत प्रवासी संघटनेने केले आहे.

दरम्यान सोमवार ता 12 मार्च सकाळ पासून कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांमार्फत कठोर कारवाई करण्यात येणार असून मोटारसायकल स्वार आणि त्यांच्या सहकारी वर्गाने हेल्मेट घालून प्रवास करावा अन्यथा त्यांच्या मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 129 / 177 अन्वये पाचशे रुपये दंड वसूल करण्यात तरीही वाहन चालकांनी नियमाचे पालन करत हेल्मेट घालावे असे आवाहन कल्याण डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी केले आहे.

Web Title: Marathi news helmet compulsory in Klayan Dombivali