बेकायदा बांधकामावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

तुर्भे - सेक्‍टर १९ मधील ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल सैराटच्या बेकायदा बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (ता. ७) कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल सैराटने बांधलेल्या बेकायदा बांधकामाला तुर्भे विभाग कार्यालयाने एम.आर.टी.पी. कायदा १९६६ मधील कलम ५३ (१) अन्वये नोटीस बजावली होती. तरीही हे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले नसल्याने अखेर तुर्भे विभागाने कारवाई करत हॉटेलचे किचन, बाथरूम शेड, गेट तसेच छतावरील पत्र्याचे शेड निष्कासित केले. या मोहिमेसाठी १ जेसीबी, गॅस कॅटर, १५ मजूर आणि तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते.

५०० बेकायदा फेरीवाले हटवले 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तुर्भे परिसरात रस्ते, पदपथांवर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या कारवाईत या परिसरातील ५०० हून अधिक फेरीवाल्यांना हटविण्यात आले. तसेच त्यांचे साहित्यदेखील जप्त करण्यात आले. यावेळी पुढील काळातही या परिसरात नियमित कारवाई होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: marathi news illegal construction mumbai