पश्‍चिम रेल्वेवरील माटुंगा स्थानकात महिलाराज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील माटुंगा रोड स्थानकात जागतिक महिला दिनापासून संपूर्णपणे महिला कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मध्य रेल्वेनंतर पश्‍चिम रेल्वेही आता पुढे सरसावली आहे. 

माटुंगा रोड स्थानकात आजच्या घडीला ३१ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यात वाणिज्य विभागात १३ महिला कर्मचारी, तीन तिकीट तपासणीस, स्टेशन मास्तर व पाईंटमनसह ११ ऑपरेटिंग महिला कर्मचारी आणि चार रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व महिला कर्मचारी एकत्रितरित्या या स्थानकाचा संपूर्ण कारभार पाहणार आहेत. रोटरी क्‍लब ऑफ बॉम्बे क्वीन, माटुंगा स्थानकाचे सौंदर्यीकरण करणार आहे. महिला सक्षमीकरण व महिलांच्या समाजातील वैविध्यपूर्ण भूमिका दर्शवणाऱ्या संकल्पनेवर तिकीट आरक्षण केंद्र, स्टेशन अधीक्षक कार्यालय, पादचारी पूल येथे चित्र रेखाटण्यात येईल.   पश्‍चिम रेल्वेवरील माटुंगा रोड स्थानक पहिले महिला स्थानक ठरणार असून मुंबई उपनगरातील दुसरे स्थानक ठरणार आहे. गेल्यावर्षी मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानक पहिल्यांदा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवले होते. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मध्ये माटुंगा स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला आहे.

Web Title: marathi news International Women Day western railway mantuga railwaystation women