जव्हारच्या उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत

भगवान खैरनार
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेत आज उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मा रजपूत यांनी राष्ट्रवादीच्या वैभव अभ्यंकर यांचा 10 विरूद्ध 7 मतांनी पराभव केला आहे. तर स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेकडून अॅड. प्रसन्ना भोईर तर राष्ट्रवादीकडून भरत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. नवनियुक्त उपनगराध्यक्षा पद्मा रजपूत यांचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. जव्हार नगरपरिषदेत थेट मतदारांकडून शिवसेनेचे चंद्रकांत पटेल नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर 17 सदस्यांपैकी 9 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत.

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेत आज उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मा रजपूत यांनी राष्ट्रवादीच्या वैभव अभ्यंकर यांचा 10 विरूद्ध 7 मतांनी पराभव केला आहे. तर स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेकडून अॅड. प्रसन्ना भोईर तर राष्ट्रवादीकडून भरत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. नवनियुक्त उपनगराध्यक्षा पद्मा रजपूत यांचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. जव्हार नगरपरिषदेत थेट मतदारांकडून शिवसेनेचे चंद्रकांत पटेल नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर 17 सदस्यांपैकी 9 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमताने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकला होता. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पद्मा रजपूत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे वैभव अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणूकीसाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. 

शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व सदस्यांनी हात वर करून पद्मा रजपूत यांना विजयी केले. पद्मा रजपूत यांना 10 तर राष्ट्रवादीचे वैभव अभ्यंकर यांना 7   मते मिळाली आहेत. जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियमच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अॅड. प्रसन्ना भोईर तर राष्ट्रवादीकडून भरत पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे एकमेव नगरसेवक असलेले कुणाल ऊदावंत यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. या निवडणूकीनंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला आहे. 

 

Web Title: Marathi news jawhar elections