जव्हारला दत्तक घेऊन, विकास करू - अशोक चव्हाण

भगवान खैरनार
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकीत, जाहीर सभांच्या प्रचार तोफांनी चांगलीच रंगत आणली आहे. काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप तेंडुलकर यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीप तेंडुलकर यांना निवडून द्या, मी जव्हारला दत्तक घेऊन, जव्हारचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दिलीप तेंडुलकर यांच्या रूपाने, जव्हारमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जव्हार हे मुंबई पासून जवळचे पर्यटनस्थळ आहे. पालघर जिल्हयातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असतानाही त्याचा विकास झालेला नाही. या भागात कुपोषणाची समस्या कायम आहे.

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकीत, जाहीर सभांच्या प्रचार तोफांनी चांगलीच रंगत आणली आहे. काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप तेंडुलकर यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीप तेंडुलकर यांना निवडून द्या, मी जव्हारला दत्तक घेऊन, जव्हारचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दिलीप तेंडुलकर यांच्या रूपाने, जव्हारमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जव्हार हे मुंबई पासून जवळचे पर्यटनस्थळ आहे. पालघर जिल्हयातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असतानाही त्याचा विकास झालेला नाही. या भागात कुपोषणाची समस्या कायम आहे. असे असताना मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या भागाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. आदिवासींचे बालके कुपोषणा ने मृत्यूमुखी पडत असल्याची घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी युती सरकारवर केली आहे.

जव्हार शहरात आरोग्याची सुविधा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि राजे यशवंतराव मुकणे यांचा ऐतिहासिक वारसा जव्हारला लाभला आहे. येथे रोजगाराची समस्या आहे. ती आम्ही सोडवणार आहोत.  जी. एस. टी. मुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. महागाईमुळे उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. नोटाबंदीने सर्व सामान्य जनतेचे हाल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला पुरते हैराण केले आहे. जव्हारची पाणी टंचाई सोडविण्यासाठी खडखड धरणातून जव्हारला पाणी आणणार तसेच जव्हारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही दिलीप तेंडुलकर यांना निवडून द्या, मी जव्हार ला दत्तक घेऊन, सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जव्हारकरांना प्रचार सभेत दिले आहे.   

काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे ऊमेदवार दिलीप तेंडुलकर यांनी यांनी आपल्या भाषणात, येथील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपले नगराध्यक्षपद सांभाळू शकत नाही, ते काय जव्हारचा विकास करणार अशी टीका केली आहे. माझे वडील स्वर्गीय बबनशेठ तेंडुलकर यांनी जव्हारची 30 वर्ष सेवा केली आहे. त्यामध्ये 17 वर्ष नगराध्यक्षपद भुषवून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. मी ही दहा वर्ष नगरसेवक व उपनगराध्यक्षपद भुषवून शहराचा विकास साधला आहे. त्यामुळे जव्हारवासियांनी मला जव्हारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगराध्यक्षपदी निवडून देण्याचे आवाहन दिलीप तेंडुलकर यांनी केले आहे. 

या जाहीर प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या अनेक मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जव्हार मध्ये काँग्रेस भक्कम झाल्याचा दावा दिलीप तेंडुलकर यांनी केला आहे. यावेळी माजी मंत्री शंकर नम यांनी आदिवासी बोलीभाषेत भाषण करून मतदारांना उत्साही केले. 
या प्रचार सभेस माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ पाटील, विजय पाटील, मनिष गणोरे, पालघर जिल्हाध्यक्ष केदार काळे, जिल्हा सरचिटणीस संदिप मुकणे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मेमन, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री अहिरे, तालुका अध्यक्ष सोमनाथ किरकिरा, माजी तालुका अध्यक्ष भरत बेंद्रे, शहराध्यक्ष फारूक मुल्ला तसेच धनंजय खेडकर यांसह सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Marathi news jawhar elections ashok chavan for campaigning