परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक 10 मार्चपूर्वी होण्याची शक्यता

रविंद्र खरात
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे यांचा एक वर्षाचा कालावधी 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असून नव्याने सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च पूर्वी सभापती पदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे यांचा एक वर्षाचा कालावधी 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असून नव्याने सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च पूर्वी सभापती पदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत आणि परिवहन समितीमध्ये शिवसेना भाजपाची युती असून युतीच्या करारानुसार सभापती पद दोन्ही पक्षाने एक वर्ष वाटून घेण्याचे ठरले आहे. यानुसार सध्या सभापती पदावर शिवसेनेचे संजय पावशे विराजमान असून त्यांचा कालावधी या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. पुढील महिन्यात परिवहन समिती सभेत नवीन सभापतीने कार्यभार स्वीकारणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका सचिव कार्यालयाने याबाबत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहार केला. आता परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणूकिसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर काम पाहतील असे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला कोकण विभागीय कार्यालयाने कळविले. आता पुढील प्रक्रिया सचिव कार्यालयामार्फत सुरू असून ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी तारीख देताच सभापती पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून ही निवडणूक 10 मार्च पूर्वी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . 

सभापती पदासाठी पुन्हा इच्छूक
आपल्याला वेळ कमी मिळाल्याने पुन्हा आपल्याला सभापती पद मिळावे, यासाठी सभापती संजय पावशे हे धावपळ करत असून वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष्य लागले आहे. मागील परिवहन समिती सभापती पद निवडणुकीमध्ये भाजपाची वेळ असताना शिवसेनेला पद देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा संजय पावशे यांना सभापती पद मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

भाजपात कल्याण विरुद्ध कल्याण मध्ये रस्सीखेच
परिवहन समिती मध्ये भाजपाचे 4 सदस्य आहेत यात डोंबिवली मधील संजय राणे हे भाजपा नगरसेवक महेश पाटील यांचे समर्थक असून प्रसाद माळी हे राज्यमंत्री आणि भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे समर्थक आहेत , तर कल्याण मधील कल्पेश जोशी हे आमदार नरेंद्र पवार यांचे समर्थक तर कल्याण पूर्व मधील सुभाष म्हस्के हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत . परिवहन समिती सभापती पद मिळण्यासाठी या सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीला सुरुवात केली असून सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे .

Web Title: marathi news kalyan dombivali municipal corporation