कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू

रविंद्र खरात
शनिवार, 13 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण मधील रात्रीचा रिक्षा प्रवास म्हणजे सर्व सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक तक्रारीनंतर कल्याण वाहतुक पोलिसांनी शुक्रवारी (ता. 12) रात्री पासून बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून लायसन्स, परवाने नसणे, गणवेश नसणे, दारू पिऊन रिक्षा चालविणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जवळील रिक्षा स्थानकातून रात्री 9 नंतर रिक्षा प्रवास कठीण झाला असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून गुरुवारी (ता. 11) एका तरुणाने आपला अनुभव आलेला व्हिडीओ फेसबुक वर व्हायरल केल्यावर पुन्हा कल्याण मधील बेशिस्त रिक्षा चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. 12) रात्री कल्याण पश्चिम एसटी डेपो समोरील रिक्षा स्थानक परिसरात धडक कारवाई केली यात गणवेश, लायसन्स, बॅच, परवाने नसणाऱ्या 10 रिक्षा चालकांच्या रिक्षा जप्त केल्याने बेशिस्त रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

अनेक वेळा रिक्षा चालकांना आवाहन करून ही रिक्षा चालक बेशिस्त वागत असून अनेक तक्रारी पाहता विशेष मोहीम हाती घेतली असून शुक्रवारी (ता. 12) जानेवारी रोजी 10 रिक्षा जप्त केल्या असून ही कारवाई पुढे सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Web Title: Marathi news kalyan news auto drivers misbehaviour