कल्याणमध्ये बायो कल्चर युनिट सेंद्रीय खत प्रकल्पाचे उदघाटन

रविंद्र खरात
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कल्याण : कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून सुरू केल्यास तो उपक्रम नेहमीच यशस्वी होतो, कचरा प्रश्न सर्वच शहरात भेडसावत असून ती समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहीजे असे मत कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी कल्याण पूर्व मधील कार्यक्रमात व्यक्त केले. 

कल्याण : कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून सुरू केल्यास तो उपक्रम नेहमीच यशस्वी होतो, कचरा प्रश्न सर्वच शहरात भेडसावत असून ती समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहीजे असे मत कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी कल्याण पूर्व मधील कार्यक्रमात व्यक्त केले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन कल्याण पूर्व पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात शून्य कचरा अभियानाअंतर्गत बायो कल्चर युनिट सेंद्रीय खत प्रकल्पाचे उदघाटन पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर, प्रभाग समिती सभापती हेमलता पावशे, नगरसेवक राजाराम पावशे, नगरसेविका शितल मंढारी यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी (ता. 9) करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उपअभियंता वैद्य, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अशोक घोडे, सहयोग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ विनोद दळवी, दिपक लिंगम, आरोग्य निरीक्षक एल. के. पाटील, ठेकेदार संघटना अध्यक्ष बंटी तरे सहित ड प्रभाग क्षेत्र कार्यालयामधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्यासाठी 8 महिन्यापूर्वी मी स्वतः घरातुन सुरुवात केली. सुरवातीला 15 दिवस माहिती नसल्याने थोडा गोंधळ उडाला मात्र त्यातील जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन कचऱ्यावरील प्रक्रीया स्वतः केली त्यामुळे आता कचऱ्याचा वास ही येत नसून चांगल्या दर्जाचे खत माझ्या घरातील झाडासाठी वापरत आहे असे सांगत तोरस्कर पुढे म्हणाले की कल्याण पूर्व मध्ये हा प्रकल्प एकाच ठिकाणी न होता पूर्ण पालिका हद्दीत व्हावे यासाठी शुभेच्छा देत पालिकेमार्फत सामाजिक संस्थांना नेहमीच मदत मिळेल असे आश्वासन यावेळी उपायुक्त तोरस्कर यांनी दिले. 

 

Web Title: Marathi news kalyan news bio culture unit fertilizer plant inauguration