जवानांनी 'भारत माता की जय' घोषणा देत काम केले पूर्ण..

रविंद्र खरात 
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कल्याण : मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून आज गुरुवारी (ता. 18) गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी काही क्षणात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल हा प्रवाशांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

कल्याण : मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून आज गुरुवारी (ता. 18) गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी काही क्षणात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल हा प्रवाशांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

दुपारी 3 वाजता कल्याण ते आसनगाव लोकल पूर्वरत सुरू झाल्याचे रेल्वे अधिकारी वर्गाने सांगितले. एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या धर्तीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी आंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला सोमवार 20 नोव्हेंबर पासून सुरवात केली होती. त्यासाठी लष्कराचे 39 हुन अधिक जवान काम करत असून ते काम अंतिम टप्प्यात आहे. हा पादचारी पूल कसारा दिशेला बांधण्यात येणार असून याची प्रस्तावित लांबी 18.29 मीटर असून रुंदी 5 मीटर आहे. 

या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आलेय. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. नवीन पादचारी पूल 50 टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पायऱ्या बांधण्यात येणार आहे या पादचारी पुलाचे गर्डर चढविण्याचे कामासाकामासाठी गुरुवारी (ता. 18) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता रेल्वेने कल्याण ते आसनगाव मेगाब्लॉक जाहीर केला होता. आज (ता. 18) सकाळी 10 वाजता रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रथम ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करत ती खाली घेतली त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता भारतीय जवानांनी क्रेनच्या मदतीने गर्डर बसविण्याचे काम सुरू केले. केवळ 9 मिनिटात रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडण्यात आले. तदनंतर रेल्वे ने आपल्या तांत्रिकदृष्ट्या कामाला सुरुवात केली. 

दुपारी 3 नंतर कल्याण ते कसारा लोकल सेवा पूर्वरत सुरू झाल्याची माहिती रेल्वे अधिकारी वर्गाने दिली मिशन पूर्ण रेल्वे स्थानकातील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण होताच भारतीय लष्कराच्या जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा देत मिशन पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. कल्याण ते आसनगाव सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत रेल्वे ने मेगाब्लॉक जाहीर केल्याने, कल्याण ते टिटवाळा केडीएमटी बस सेवा सोडण्यात आल्या. यासाठी केडीएमटी महाव्यस्थापक देविदास टेकाळे यांनी श्याम पष्टे, संदीप भोसले समवेत 10 अधिकारी वर्गाची नेमणूक केली होती. दुपारी सव्वादोन पर्यंत कल्याण ते टिटवाळा या दरम्यान 49 फेऱ्यामधून 3 हजार प्रवाशांनी प्रवास केला. या बस सेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. 

आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधत असून आज गर्डर टाकण्यात येणार आहे. रेल्वेकडून पाच तासांचा मेगाब्लॉक घेतला मात्र आम्ही आमचे काम एक तासाच्या आत पूर्ण करू मात्र त्यानंतर रेल्वेमार्फत तांत्रिक दुरुस्तीच्या काम केली जातील मात्र आम्हाला दिलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण केल्याची माहिती भारतीय लष्कर अधिकारी धीरज मोहन यांनी दिली. 
 

Web Title: Marathi news kalyan news completion of work of bridge