वीजेच्या क्षेत्रात चुकीला माफी नाही

रविंद्र खरात
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कल्याण : वीज ग्राहक व कर्माचाऱ्यामंध्ये वीज सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजे कारण वीज अपघातामुळे गंभीर दुखापती व जिवहानी होते. विजेच्या क्षेत्रात चुकीला माफी नाही, असे विचार वीज सुरक्षा रॅलीच्या समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी व्यक्त केले.

वीज सुरक्षा सप्ताह निमित्ताने आज गुरुवारी (ता. 11) सकाळी महावितरण कल्याण पश्चिम विभागातर्फे वीज सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप महावितरण कल्याण परिमंडळाच्या प्रशासकीय इमारत ‘तेजश्री’ च्या परिसरात करण्यात आला. 

11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत महावितरण व राज्य शासनाच्या उर्जा व कामगार विभागातर्फे सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून या कालावधीत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘बाजारामध्ये अनेक कंपन्यांची वीज उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु विकत घेताना ग्राहकांनी आयएसआय मार्क असलेलीच उपकरणे विकत घ्यावी. तसेच वीज उपकरणे ओल्या हातांनी हाताळू नये. खाजगी वायरमनकडून लाईनवरची कामे करवून घेऊ नये. पतंग काढणे अथवा कोणत्याही कारणासाठी पोलवर चढू नये, तारेच्या कुंपणात विजप्रवाह सोडू नये, असे  मार्गदर्शन मुंडे यांनी यावेळी केले. 

वीजवाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास वीज कंपनीच्या कार्यालयास टोल फ्री क्रमांक 18002003435 / 18002333435 यावर संपर्क साधावा. तसेच विद्युत अपघात घडल्यास वीज कंपनीस त्वरित कळविण्याचे आहवाहनही मुंडेंनी यावेळी केले.

वीज सुरक्षा रॅलीच्या सुरुवातीला कल्याण मंडळ 1 चे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना संबोधित कारताना विजेच्या अपघातापासून बचाव कसा करवा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच तांत्रिक कामगारांनी पोलवर कामे करतांना सुरक्षा साधनाचा वापर करावा, असे आवाहनही केले. 

कल्याण मंडळ 2 चे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, महावितरण कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगांबर राठोड, कल्याण चाचणी विभागा 1 चे कार्यकारी अभियंता प्रियदर्शन कोथंबिरे, कल्याण मंडळ 2 चे कार्यकारी अभियंता (प्रशासन) नंदकिशोर काळे तसेच इतर अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षा रॅलीत भाग घेतला.

Web Title: Marathi news kalyan news electricity security