कल्याण-विद्यार्थी, दिव्यांग, अंध, मूकबधीर, कुष्ठरोगी नागरिकांना मोफत बसपासची मागणी

रविंद्र खरात 
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या केडीएमटी बस मधून शालेय विद्यार्थी, दिव्यांगांसहीत अंध, मतिमंद, मूकबधीर, कुष्ठरोगी नागरीकांना मोफत प्रवास पास देण्याची अंमलबजावणी लवकरच करू अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका  परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी सकाळला दिली.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या केडीएमटी बस मधून शालेय विद्यार्थी, दिव्यांगांसहीत अंध, मतिमंद, मूकबधीर, कुष्ठरोगी नागरीकांना मोफत प्रवास पास देण्याची अंमलबजावणी लवकरच करू अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका  परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी सकाळला दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समितीची सभा मागील आठवड्यात बुधवारी (ता.7) संपन्न झाली. या सभेत परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी आणि संतोष चव्हाण यांनी 40 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगासह अंध, मतिमंद, मूकबधीर, कुष्ठरोगी नागरीकांना केडीएमटी बस मधून मोफत प्रवास पास द्यावा तसेच सभापती संजय पावशे यांनी शालेय विद्यार्थ्यांना केडीएमटी बसमधून मोफत प्रवास पास देण्याची मागणी केली होती. ते प्रस्ताव त्यादिवशी मंजूर झाले होते त्या सर्व प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी डोंबिवली मधील 53 वर्षीय दिव्यांग नागरीक दत्तात्रय सांगळे यांनी सभापती संजय पावशे आणि सदस्य मनोज चौधरी यांची आज गुरुवारी (ता. 15) भेट घेऊन निवेदन दिले. लवकरात लवकर याचा निर्णय घेऊ असे आश्वासन सभापती पावशे यांनी संबधित नागरीकांना दिले.

तद्नंतर सकाळशी बोलताना सभापती संजय पावशे म्हणाले की, शासन धोरण आणि पालिका अनुदान किती आहे तो मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असून त्याची अंमलबजावणी व्हावी, नवीन अंदाजपत्रकात तरतूद व्हावी यासाठी सभापती राहुल दामले, महापौर राजेंद्र देवळेकर, सर्व पक्षीय गटनेते, आयुक्त यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले. या अगोदर सवलत देत असून त्याचा आर्थिक बोजा केडीएमटीवर पडत असून उत्पन्न आणि खर्च आणि सवलत याची सांगड घालता यावा यासाठी काही काळ लागेल मात्र काही महिन्यात शाळकरी विद्यार्थी, दिव्यांगांसहीत अंध, मतिमंद, मुकबधीर, कुष्ठरोगी नागरीकांना केडीएमटी बस मधून मोफत प्रवास पास देण्याची अंमलबजावणी करू अशी माहिती सभापती पावशे यांनी यावेळी सकाळला दिली.
 

Web Title: Marathi news kalyan news handicapped blind mentally week free bus pass