कल्याण - राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन

सुचिता करमरकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे जिल्‍हा तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी संघटनेच्या सयुंक्‍त विद्यमाने पुरुषांसाठी निमंत्रितांची राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. सोमवार 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीत ही स्‍पर्धा स्‍व. जयंत नथु देवळेकर क्रीडा नगरी, अनुपम घोलप नगर, कल्‍याण येथे होणार आहे. ठाणे जिल्‍हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्‍यमंत्री रविंद्र चव्‍हाण उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दिव्यांग खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सोळा संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. डी जी पुणे, इन्कम टॅक्‍स पुणे, बीपीटी मुंबई, देना बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, मुंबई तसेच ठाणे आणि मुंबई पोलीस दल असे प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. विजेत्‍या संघास प्रथम पारितोषिक पंचाहत्तर हजार रुपये आणि चषक, तर  उप विजेत्या संघास पन्‍नास हजार रुपये आणि चषक आणि उप उपांत्‍य विजयी संघास रुपये पंचवीस हजार आणि चषक दिले जाणार आहे. स्‍पर्धेतील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडुला  दहा हजार रुपये, उत्‍कृष्‍ट खेळाडू आणि उत्‍कृष्‍ट पकड प्रतिदिन दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. या स्‍पर्धेचे मुख्‍य आकर्षण म्‍हणजे महापालिका शाळेतील विद्यार्थीनी आणि दिव्‍यांग महिला संघाचा प्रदर्शनीय कबड्डी सामना खेळविला जाणार आहे. यातील विजेत्‍या संघास रोख रक्‍कम  पंधरा हजार तर उपविजेत्‍या संघास दहा हजार रुपये देण्‍यात येणार आहे.

Web Title: Marathi news kalyan news kabaddi competition