कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद

सुचिता करमरकर
बुधवार, 14 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याबाबतचा निर्णय जुलै 2018 पर्यंत घेण्याचे निर्देश विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. कल्याणचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर हे निर्देश देण्यात आले आहेत. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्याला दुजोरा दिला.

सात सप्टेंबर 2015 ला शासनाने या स्वतंत्र नगर परिषदेसंदर्भात हरकती सुचना मागवल्या होत्या. यावर कोकण विभागीय आयुक्तस्तरावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. 2016 लागणार पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली गेली. शिंदे यांच्या तारांकित प्रशनावर सरकारने आजही तेच लिखीत उत्तर दिले. आयुक्त स्तरावरील कारवाईला आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे याची जाणीव आहे शिंदे यांनी सभागृहात करुन दिली. असे अहवाल जाणीवपूर्वक उशीरा सादर केले जातात का? असा प्रश्र्न शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर चर्चा झाली आणि सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला जुलै 2018 पर्यंत विहीत प्रक्रिया पुर्ण करुन सरकारने निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. 

Web Title: Marathi news kalyan news kalyan dombivali municipal corporation nagar parishad