कल्याण एस.टी. डेपोत सुरक्षितता मोहीम सप्ताहाचे उदघाटन

रविंद्र खरात
बुधवार, 10 जानेवारी 2018

कल्याण : प्रत्येक वाहन चालकाने रस्ता सुरक्षा सप्ताह हा एक दिवस नाही, वर्षभर नाही, तर आयुष्यभर साजरा करा असे आवाहन कल्याण आरटीओ वाहन निरीक्षक अशोक शिंदे यांनी कल्याण मधील एका कार्यक्रमात केले. 

कल्याण : प्रत्येक वाहन चालकाने रस्ता सुरक्षा सप्ताह हा एक दिवस नाही, वर्षभर नाही, तर आयुष्यभर साजरा करा असे आवाहन कल्याण आरटीओ वाहन निरीक्षक अशोक शिंदे यांनी कल्याण मधील एका कार्यक्रमात केले. 

एसटी महामंडळातर्फे सुरक्षितता मोहीम सप्ताह बुधवार 10 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. आज बुधवारी (ता. 10) कल्याण एसटी डेपोत सुरक्षितता मोहीम सप्ताहाचे उदघाटन कल्याण आरटीओचे वाहन निरीक्षक अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी एसटी कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करताना म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज नाही, एसटीचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर असल्याने प्रवासी आजही एसटी मधून प्रवास करत आहेत, एसटी चालकांना आवाहन की मद्यपान करू नका, रस्त्यावर आपल्या सोबत प्रवासी, चालणारे नागरीक आणि अन्य वाहन चालकांची सुरक्षिता तुमच्या हाती असल्याने प्रत्येक क्षणाला सतर्क राहून सुरक्षा सप्ताह एक आठवडा, वर्षभर नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. 

यावेळी कल्याण एसटी डेपो व्यवस्थापक प्रतिभा भांगरे यांनी एसटी कर्मचारी वर्षभर सुरक्षितेची काळजी घेतात म्हणून प्रवाशांची संख्या वाढत असून आता प्रत्येक कर्मचारी वर्गाची जबाबदारी वाढली असल्याचे सांगत भांगरे पुढे म्हणाल्या की, काम केल्यास पगार मिळतो त्यामुळे प्रत्येकाचे कुटुंब चालते यामुळे स्वतः सुरक्षित राहिल्यास प्रवासी, पादचारी, अन्य वाहन चालक असे अनेक जण सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळावे आणि प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखत उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी एसटी डेपो मधील वाहक चालक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

एसटी चालकाने रात्रीच्या वेळी अकस्मात येणाऱ्या अडथळ्यास तोंड देण्यासाठी तयार रहा, रात्रीच्या वेळेस डिपरचा वापर करा, रात्रीच्या वेळेस बस चालविताना सावधगिरी बाळगा, रस्त्यावर आपल्या आणि पुढील वाहनात सुरक्षित अंतर ठेवा, वळणावर ओव्हर टेक करू नका, घाट चढताना ओव्हरटेक करू नका, बस चालविताना मोबाईल वापरू नका, एसटी बस स्थानकात बस पुढे मागे करताना वाहकाची मदत घ्या, प्रवासी उतरताना आणि चढताना दरवाजा बंद केल्यावरच बस सुरू करा असे आवाहन करणारे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

 

Web Title: Marathi news kalyan news kalyan st depot security week inauguration