कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वेच्या सिंग्नल यंत्रणेत बिघाड

रविंद्र खरात 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कल्याण : कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तासाहून अधिक काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली, कुठलीही सूचना किंवा माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळावरून चालत पायपीट करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

कल्याण : कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तासाहून अधिक काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली, कुठलीही सूचना किंवा माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळावरून चालत पायपीट करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

रेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट ए वन वरून आज (ता. 26) दुपारी 1 वाजून 28 मिनिटाला लोकल मुंबईच्या दिशेने सुटली मात्र ती पत्रीपुलाजवळ येताच बंद पडली, बघता बघता लागोपाठ लोकलच्या रांगा लागल्या, नेमके काय घडले ते न समजल्याने अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून पायपीट करत कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले.

सध्या उन्हाचे चांगलेच वातावरण तापले असून वारंवार लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांनी मोटारमॅन यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खराब असल्याने लोकल पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रवास करायचा असल्याने लोकलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसल्याने लोकलच्या डब्यात बसल्याशिवाय पर्याय नव्हता. या घटनेमुळे कल्याण ते ठाकुर्ली, कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. 1 वाजून 30 मिनिटाला बंद पडलेल्या लोकल गाड्या 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

सव्वा एक तासाहून अधिक काळ लोकलमध्ये आहे, लोकल बंद का आहे, कुठलीही सूचना नसल्याने प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रुळावर चालत आहेत, त्यांचा अपघात होऊ शकतो, याबाबत रेल्वेने उपाय योजना करायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया कुडंलिक बंडगर या लोकल मधील प्रवाश्याने दिली.

लोकल मधील प्रवासी दिलीपसिंग साळुंखे यांनी सांगितले की 23 तारखेला ही तानशेत रेल्वे स्थानक दरम्यान सिंगनल यंत्रणा बिघाड झाल्याने सेवा विस्कळीत झाली होती, आज ही तेच घडले, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आमची झाली असून मागील चार दिवसात तीन वेळा मध्य रेल्वे च्या प्रवाशांना रेल्वेचा शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक दरम्यान दुपारी एक वाजून 33 मिनिटाला सिंगनल यंत्रणामध्ये बिघाड झाला होता तो 2 वाजून 55 मिनिटाला सुरू करण्यास प्रशासनाला यश आले असून आता लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती कल्याण स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी दिली.

Web Title: Marathi news kalyan news kalyan to thakurli signal off