केडीएमटी कामचुकार अधिकारी कर्मचारी, संघटनेच्या हस्तक्षेपामुळे डबघाईला 

रविंद्र खरात 
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

कल्याण : केडीएमटी बसमधून लाखो प्रवासी प्रवास करून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. मात्र केडीएमटीच्या काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे दिवसेंदिवस उपन्न घटत चालली असून वेळीच या अधिकारी कर्मचारी वर्गावर कारवाई न केल्यास केडीएमटी बंद होईल यासाठी उपाययोजना करा अशी मागणी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे केली आहे . 

कल्याण : केडीएमटी बसमधून लाखो प्रवासी प्रवास करून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. मात्र केडीएमटीच्या काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे दिवसेंदिवस उपन्न घटत चालली असून वेळीच या अधिकारी कर्मचारी वर्गावर कारवाई न केल्यास केडीएमटी बंद होईल यासाठी उपाययोजना करा अशी मागणी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे केली आहे . 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या प्रति महिन्याच्या कारभार चालतो याबाबत भाजपा परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनी माहितीचा अधिकार मध्ये मागितली होती, त्यात अनेक चुका समोर आल्या असून केवळ केडीएमटी अधिकारी कर्मचारी वर्गाच्या ढिसाळ नियोजनामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप सदस्य संजय राणे यांनी केला आहे. 

केडीएमटीचा उद्देश मुळात शहरातील नागरीकांना सेवा द्यावी म्हणून सुरू केली आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला मात्र केडीएमटी मधील अधिकारी, कर्मचारी, काही कर्मचारी संघटनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरीक केडीएमटी सेवेपासून वंचित राहत आहेत. 

टिटवाळा मधील टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर बस सुरू केली मात्र उपन्न मिळत नसल्याचे सांगत बस बंद केल्याने नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण मधील रिंगरुट दुर्गाडी आणि बिर्ला कॉलेज मार्गे बस धावते या मार्गावर  डिसेंबर 2017 या महिन्यात दिवसभरात 2 बस सोडत शेकडो फेऱ्या मारून ही 8 लाख 22 हजार 999 रुपयांचे उपन्न मिळाले या मार्गावर सकाळ आणि सायंकाळी जास्त बसेस दिल्यास प्रति महिना 10 लाखाहुन उपन्न मिळू शकते. 

याचप्रमाणे कल्याण पूर्व मधील चिंचपाडा, कल्याण पश्चिम मधून मलंगगड, भिंवडी, डोंबिवली मधून सुटणाऱ्या निवासी, लोढा हेवन आदी मार्गावर हीच परिस्थिती असून केवळ प्रशासकीय आडमुठ्या धोरणामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप सदस्य संजय राणे यांनी केला आहे. 

कल्याण ते पनवेल फुकट प्रवास
कल्याण ते पनवेल या मार्गावर डिसेंबर 2017 महिन्यात 24 लाख 53 हजार 465 रुपयांचे उपन्न मिळाले असले तरी यामार्गावर रात्रीचे नागरिक फुकट प्रवास करत असून ते पैसे काही केडीएमटी अधिकारी कर्मचाऱ्यांची टोळी आपल्या खिशात टाकत असून याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदस्य राणे यांनी केली आहे . 

पहिले शहरात सक्षम व्हा नंतर बाहेरच्या शहरात सेवा द्या
कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात नव्याने लोकवस्ती वाढत असून तेथे खासगी वाहणाकडून नागरिकांची पिळवणूक होत असून तेथे केडीएमटीने सेवा दिल्यास उपन्न वाढ होईल त्यासाठी सर्वे करावा अशी मागणी सदस्य संजय राणे यांनी केली आहे. 

मागणी 
कामचुकार अधिकारी कर्मचारी वर्गावर कारवाई करा, कर्मचारी संघटनेचा हस्तक्षेप कमी करा, सकाळ आणि सायंकाळी घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशी नागरिकांची धाव असते अशा वेळी वेळापत्रक न ठेवता प्रति 10 मिनिटाला बससेवा ठेवा, उत्पन्न वाढीच्या मार्गावर बसेस वाढवा, नोकरभरतीसाठी शासन मान्यता देणार नाही मात्र आता असलेल्या कर्मचारी वर्गाचा वय आणि कामाचा आढावा घेणे काळाची गरज.

या मागण्यावर काम केल्यास प्रति महिना 2 ते 3 लाख रुपयांचे वाढ होणार असल्याचे दावा परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनी केला असून पालिका आयुक्त पी. वेलरासु काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Marathi news kalyan news kdmt employees unions interference