कल्याण - केडीएमटी कर्मचारी वर्गासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

रविंद्र खरात 
मंगळवार, 13 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमात (केडीएमटी) काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी आज मंगळवारी (ता. 13) आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन समितीचे आजी माजी परिवहन समितीचे सभापती यांच्या हस्ते करण्यात आले. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमात ( केडीएमटी ) मध्ये पाचशे हुन अधिक अधिकारी कर्मचारी काम करतात. पगार नाही, थकबाकी नाही, कामाचे व्याप, यातून मार्ग काढत उपन्न वाढीसाठी केडीएमटीचे अधिकारी कर्मचारी दिवसरात्र काम करताना मानसिक त्रास वाढला असून त्याचा आरोग्यावर ही परिणाम होऊ लागला आहे.

आरोग्य सदृढ राहावे यासाठी आज (ता. 13) केडीएमटीच्या गणेश घाट कल्याण डेपोमध्ये शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र शहाड, एस. एस. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर भिंवडी च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन सभापती सुभाष म्हस्के माजी सभापती आणि समिती सदस्य संजय पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सदस्य राजेंद्र दीक्षित, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, केडीएमटी अधिकारी संदीप भोसले समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो कर्मचारी अधिकारी वर्गाने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. सदस्य आणि सभापती माजी सभापती यांनी आपल्या भाषणात कर्मचारी वर्गाला शुभेच्छा देत आरोग्य सदृढ राहण्यासाठी असे शिबिराचे आयोजन झाले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.

Web Title: Marathi news kalyan news kdmt health camp