कल्याण - कामचुकार अधिकारी वर्गावर कारवाई करा 

रविंद्र खरात 
बुधवार, 14 मार्च 2018

कल्याण : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून वातावरण ही चांगलेच तापले असून या काळात केडीएमटीच्या ताफ्यात असलेल्या 10 एसी बसेस रस्त्यावर धावणे आवश्यक होते मात्र सध्या 5 एसी व्हॉल्वो बस रस्त्यावर धावत असल्याने आर्थिक नुकसान होत असून निष्काळजी आणि कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्याकडे केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) ताफ्यात एसी व्हॉल्वो 10 बसेस आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाचे तापमान ही वाढल्याने या बसेस सोडाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. मात्र 10 पैकी 5 बसेस रस्त्यावर धावत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे, यावर परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी डेपो मध्ये जाऊन माहिती घेतली असता. डेपो मधील कार्यशाळेच्या दुर्लक्षामुळे बसेस कमी धावत असल्याचा आरोप सदस्य चव्हाण यांनी केला आहे. 

अनेक एसी बसेस मधील एसीचे कुलिंग होत नाही, बसेस मधील इंजिन ऑईल वेळेत बदल न केल्याने इंजिन गरम होत असून त्यामुळे बस खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. 10 बसेस पैकी 3 बस क्रमांक (1124, 1128, 1123) या मागील 6 महिने झाले दुरुस्तीसाठी गेल्या मात्र पेमंट न दिल्याने त्या बसेस पडून आहेत. एसी बस क्रमांक (1130) ही नादुरुस्त वसंत व्हॅली डेपो मध्ये उभी आहे . तर बस क्रमांक (1131) एसी कुलिंग होत नसल्याने डेपो मध्ये उभी आहे . तर उरलेल्या 5 बसेस रस्त्यावर धावत आहेत, मात्र आता ऐन उन्हाळ्यात या बस मध्ये एसी कुलिंग कमी जास्त होत असल्याने कधी ही बंद पडू शकतात, केवळ कार्यशाळेच्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षपणामुळे ऐन उन्हाळ्यात उपन्न घटत आहे, यावर त्वरित तोडगा काढून 10 च्या 10 एसी बसेस रस्त्यावर धावल्यास प्रवासी वाढून उपन्न वाढ होऊ शकतो . यासाठी कामचुकार अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्याकडे केली असून आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष्य लागले आहे.

Web Title: Marathi news kalyan news kdmt st buses not in good condition