गुरुवारी कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक 

रविंद्र खरात
बुधवार, 17 जानेवारी 2018

कल्याण : एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटना घडल्यानंतर भारतीय लष्कराने आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल 20 नोव्हेंबर पासून कामाला सुरुवात केली होती ते काम अंतिम टप्यात असून गुरुवारी (ता. 18) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला असून या कालावधीत कल्याण ते मुंबई सिएसटीएम आणि कुर्ला या दरम्यान विशेष लोकल गाड्या सोडण्यात येतील तर कल्याण ते कसारा दरम्यान एसटी आणि केडीएमटीच्या विशेष बसेस सोडण्यात याव्या यासाठी संबधित विभागाला कळविले असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी सकाळला दिली. 

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटना नंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 

मध्य रेल्वेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला सोमवार 20 नोव्हेंबर पासून सुरवात झाली असून त्यासाठी लष्कराचे 39 जवान काम करत असून ते काम अंतिम टप्प्यात आहे. हा पादचारी पूल कसारा दिशेला  बांधण्यात येणार असून याची प्रस्तावित लांबी 18.29 मीटर असून रुंदी 5 मीटर आहे. या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आलेय. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. 

नवीन पादचारी पूल 50 टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पायऱ्या बांधण्यात येणार आहे या पादचारी पुलाचे गर्डर चढविण्याच्या कामासाकामासाठी गुरुवारी (ता. 18) सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत कल्याण ते आसनगाव या रेल्वे स्थानक दरम्यान विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत कसारा ते कल्याण या रेल्वे स्थानक जवळून एसटी आणि केडीएमटी बस सोडाव्या यासाठी परिवहन विभागाला सूचना केल्या असून कल्याण ते  मुंबई सीएसटीएम आणि कल्याण ते कुर्ला या रेल्वे स्थानक दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी सकाळला दिली. 

मेगाब्लॉकमुळे त्रास होऊ नये म्हणून कल्याण ते आंबिवली आणि टिटवाळा या दरम्यान केडीएमटीच्या 10 बसेस सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत सोडण्यात येणार असून गरज भासल्यास अन्य बसेस सोडू अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. 

मागणी 
मेगाब्लॉक बाबत प्रवासी वर्गाला विश्वासात घेणे गरजेचे आहे, ते एक आठवडा अगोदर जाहीर करणे गरजेचे होते मात्र आता गुरुवारी मेगाब्लॉक दरम्यान कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी, केडीएमटी आणि खासगी बसेस शासकीय यंत्रणाने सोडावे, तशी घोषणा त्या परिसराच्या रेल्वे स्थानकात करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Marathi news kalyan news mega block at kalyan to asangao