राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

सुचिता करमरकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

कल्याण : राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधत कल्याण शहरातील सुभेदार वाडा कट्ट्याने सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात शहरातील वीस शाळांमधील साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर मोरेश्वर भोईर, यावेळी उपस्थित होते. 

भारतीय व्यायाम पध्दतीत सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. विद्यार्थ्यांना त्याचे महत्व समजावे त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शरीराला या व्यायामाचा लाभ होतो, विद्यार्थी वर्गाने हा व्यायाम दररोज केला पाहिजे असे विचार महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कट्ट्याचे अध्यक्ष दिपक जोशी यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी शहर स्वच्छतेची शपथ घेतली. योगप्रशिक्षक सुधाकर दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बारा सूर्य नमस्कार घातले.

Web Title: Marathi news kalyan news national suryanamskar day