आजपासून कल्याणमध्ये 'नो हॉर्न प्लीज'

रविंद्र खरात
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी व ग्रामीण भागात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जेथे गरज नसताना वाहनांच्या कर्कश्श हॉर्नच्या आवाजाने नागरीक त्रस्त आहेत. म्हणूनच त्यातून कल्याण आरटीओ मार्फत अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याचा शुभारंभ आज शुक्रवार (ता. 22) कल्याण मधील सोनावणे कॉलेज पासून सुरुवात करण्यात आली. यात वाहन चालविताना कमीत कमी हॉर्न वाजविण्याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. 

कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, शहाड, टिटवाळा, आंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड ग्रामीण आदी शहरांचा समावेश होतो. या शहरात दुचाकी, कार, बस, अवजड वाहन, रिक्षा आदींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही संख्या रोखणे ही कठीण झाले आहे. 

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यावर वाहन चालक वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला असून अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस आणि आरटीओचे विशेष पथक कारवाई करतात. मात्र ती कारवाई ही कमी पडते. यामुळे रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत कल्याण आरटीओ अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून आज शुक्रवार (ता. 22) पासून कल्याण आरटीओने प्रवासी संघटनेला सोबत घेऊन 'नो हॉर्न प्लीज' हा अभिनव उपक्रम सुरू केला असून आज पहिल्या दिवशी कल्याण मधील सोनावणे कॉलेज मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांच्या समवेत कॉलेज मधील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वाहनाचे लायसन्स कसे काढावे, त्याची परीक्षा कशी द्यावी, कशी तयारी करायवी त्यासोबत रस्त्यावर वाहन चालविताना कमीत कमी हॉर्न न वाजविता कसे वाहन चालवावे याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परीवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. तर यावेळी कारणाशिवाय हॉर्न वाजविणार नाही अशी मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यानी शपथ घेतली. नो हॉर्न प्लीज हा उपक्रम पुढील काळात शाळा कॉलेज मध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आरटीओ अधिकारी ससाणे यांनी दिली.

Web Title: Marathi news kalyan news no horn please activity