कल्याण-डोंबिवलीत 15 जुलैपासून प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी

रविंद्र खरात
मंगळवार, 27 जून 2017

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचऱ्याची विल्हेवाट लावताना येणारे अडथळे दूर करण्यातील महत्त्वाचा अडथळा ठरलेल्या प्लास्टिकला अटकाव करण्यासाठी त्याच्या वापरावरच 15 जुलै 2017 पासुन बंदी घालण्याचा निर्णय महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी पालिका प्रशासनने कंबर कसली आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचऱ्याची विल्हेवाट लावताना येणारे अडथळे दूर करण्यातील महत्त्वाचा अडथळा ठरलेल्या प्लास्टिकला अटकाव करण्यासाठी त्याच्या वापरावरच 15 जुलै 2017 पासुन बंदी घालण्याचा निर्णय महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी पालिका प्रशासनने कंबर कसली आहे.

नुकत्याच झालेल्या देशपातळीवरील स्वच्छता अभियानामध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा 234 वा क्रमांक आला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून पालिकेच्या कारभारावर टीका झाली होती. दरम्यान 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापूरानंतर सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंधाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही हाती घेतली होती. 2 जून 2017 ते 23 जून 2017 या कालावधीत पालिका हद्दीत 648 किलो 100 ग्राम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्याकडून 1 लाख 38 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरु असताना अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून अनेक नाल्यात आणि गटारांमध्ये नागरिकांनी पिशव्या टाकल्याने नाले सफाईला अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे .

प्लास्टिक बंदीसाठी मोदीना साकडे...
प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून त्याचा वापर केल्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य आणि महानगरपालिक परिसरामध्ये प्लास्टिक बंदी घालावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी पत्र लिहिले आहे. ते केवळ पत्र लिहून थांबले नाहीत, तर कल्याण पूर्वमध्ये प्लास्टिक पिशव्या विकत घेण्याची मोहिम राबवली. त्यात हजारो किलो प्लास्टिक जमा झाले. तो वापर पाहून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्यावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे करण्यात आली होती. महापौर देवळेकर यांनी काही दिवसांपूर्वी सामाजिक संघटनाची बैठक घेवून साधकबाधक चर्चा करून 15 जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची घोषणा केली आहे, या घोषणेची "सहयोग' सह अनेक संस्थानी स्वागत करत पालिकेला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

शहरातील कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे प्लास्टिकचे दिसून येते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अडचण आणि पावसाळ्यात नाले आणि गटारांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक संस्था आणि नगरसेवकांच्या मागणीनुसार 15 जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. पालिकेने कारवाई केल्यानंतरही प्लास्टिकचा वापर सुरुच आहे. आता महापौर यांनी जाहीर केल्यानुसार पालिका हद्दीत प्रबोधन केले जात असून ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या आहेत, त्या 15 जुलैच्या आत वापर करावा. त्यानंतर पालिकेमार्फत धड़क कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली आहे.

Web Title: marathi news kalyan news plastic bag dombiwali news