कल्याण: रासायनिक कचरा टाकणाऱ्या कारखान्यावर कारवाई

सुचिता करमरकर
मंगळवार, 27 जून 2017

अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकणाऱ्या डीजीकेम या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.

कल्याण - अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकणाऱ्या डीजीकेम या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. मंडळाने कारखान्याचा विद्युत तसेच पाणी पुरवठा बंद केला आहे.

मे महिन्यात चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा आढळून आल्याने खळबळ माजली होती. पावसात हा कचरा धरणाच्या पाण्यात येण्याची भीती होती. यावर तब्बल एक महिन्यानंतर कारवाई झाली. मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी ही कारवाई केली. अंबरनाथ मधील औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा तळोजा येथे टाकला जातो. मात्र डीजीकेमने हा कचरा धरण परिसरात टाकल्याची कबुली दिली.

Web Title: marathi news kalyan news pollution action against factory