ओपन लँन्ड टॅक्स विरोधात कल्याण-डोंबिवली पालिकेवर मोर्चा

सुचिता करमरकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कल्याण : ओपन लँन्ड टॅक्स विरोधात बांधकाम व्यावसायिकांनी आज कल्याण डोंबिवली पालिकेवर भव्य मोर्चा काढून शासन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात व्यावसायिकांबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही सहभागी झाल्याने मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता आयुक्तांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. आगामी काळात कर रचनेत बदल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे पाठवला आहे. मात्र यापूर्वीच्या थकबाकीबाबत अभय योजना राबवण्याचा निर्णय एकांगी असेल असे स्पष्ट केले. मोर्चेकऱ्यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आयुक्तांशी चर्चा केली. 

कडोमपा क्षेत्रात ओपन लँन्ड टॅक्स इतर पालिकांच्या तुलनेत अधिक आहे हे आयुक्त पी वेलारसू यांनी मान्य केले. या रचनेत सुधारणा करत हा दर दोन टक्के इतका कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे पाठवला आहे. यापूर्वीच्या थकबाकीबाबत अभय योजना राबवण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. मात्र त्यावर कोणतेही आश्वासन न देता आयुक्तांनी याचा सर्वदृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ओपन लँन्ड टॅक्ससाठी अभय योजना राबवली तर ज्यांनी कराचा भरणा केला आहे त्यांच्यावर अन्याय होईल. याशिवाय पालिकेचे आर्थिक नुकसानही होईल. यामुळे या मागणीचा एकांगी विचार न करता सर्वदृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही हा विषय मांडण्यात आला आहे. त्यामुळे यातून उत्तम मार्ग निघेल अशी आशा व्यावसायिक व्यक्त करत आहेत. 

Web Title: Marathi news kalyan news rally on kalyan dombivali municipal corporation regarding open land tax