कल्याण आरटीओमार्फत रिक्षा परवाने वाटप सुरू

रविंद्र खरात
गुरुवार, 22 जून 2017

कल्याण - राज्याच्या परिवहन विभागाने मोटार वाहन कायद्यातील परवान्यांवरील मर्यादा पूर्णपणे हटविली आहे. रिक्षांप्रमाणेच काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीच्या परवाना वाटपावरील निर्बंधही राज्यभरात संपुष्टात आणले असून, त्यामुळे "मागेल त्याला परवाना' हे सूत्र अंमलात आले आहे. त्यामुळे नवीन परवाने घेण्यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली आहे.

राज्य सरकारने 1997 पासून रिक्षा-टॅक्‍सी परवान्यांच्या वाटपावर निर्बंध आणले होते. विशिष्ट संख्येच्यावर परवान्यांचे वाटप होणार नाही, याची दक्षता घेतली जात होती. मात्र, त्यामुळे परवान्यांचा काळाबाजार वाढला होता. विविध सरकारी अधिकाऱ्यांसह अनेकांनी नियमांचे उल्लंघन करत रिक्षा आणि टॅक्‍सीचे परवाना प्राप्त केले होते. परवान्याशिवाय रिक्षा, टॅक्‍सी चालविणे कायद्याचा भंग ठरत असल्याने त्याचा फायदा घेत गैरमार्गाने मिळवलेल्या रिक्षा, टॅक्‍सी परवानाधारकांनी काळ्या बाजारात परवान्यांची विक्री करणे वा तो भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे परवाना नसलेल्या चालकांकडून प्रत्येक पाळीमागे संबंधित परवानाधारकास काही रक्कम देण्याची पद्धत सुरू झाली. नेमकी हीच पद्धत संपुष्टात आणण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला परमिट योजना आणली. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कल्याण आरटीओ कार्यालयामध्ये एक खिडकी योजना सुरु केली आहे.

कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या शहरात परवाना नसणाऱ्या हजारो रिक्षाचालकांना याचा फायदा होईल आणि स्वत:ची रिक्षा नसणाऱ्यांना रोजगार मिळणार असून रिक्षा चालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले आहे.

रिक्षा परवान्यासाठी काय करावे?
एक अर्ज करावा, तीन पासपोर्ट फोटो, महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षे वास्तव्य दाखला, गुन्हा दाखल नसल्याचा पोलिस अहवाल, परवाना, बॅच, प्रतिज्ञापत्र नोटरी यासोबत आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, विज बिल किंवा मालमत्ता कर पावती, रेशनिंग कार्ड आदी कागदपत्रे जमा करावे लागणार आहे. परवान्यासाठी सकाळी 11 ते दुपारी एकच्या सुमारास अर्ज करता येणार आहे.

Web Title: marathi news kalyan news rikshaw permission auto rikshaw permission