कल्याण - रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी पालिकेने जाहिर केली नोटीस

सुचिता करमरकर
मंगळवार, 6 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी पालिकेने जाहिर नोटीस प्रसिद्ध केली आहे. या रस्त्यावरील बाधितांना पालिका टी डी आर स्वरुपात भरपाई देणार असून त्यामुळे भू धारकांचा लाभ होईल असा दावा पालिका आयुक्त पी वेलारसू यांनी केला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे जमिन मालकांची फसवणूक होणार असल्याची बातमी पसरवली जात असल्याबद्दल आयुक्तांनी खेद व्यक्त केला. 

सात टप्प्यात रिंग रोडचे काम केले जाणार आहे. यातील चौथ्या टप्प्याचे काम सर्व प्रथम सुरु केले जाईल. या टप्प्यातील 80 टक्के जमिन मालकांनी आपली संमतीपत्रे पालिकेला दिली आहेत. रिंग रोडमधे ताब्यात घेण्यात येणाऱ्या जमिनीमधील  ऐंशी टक्के जागा हरित क्षेत्र असल्याने तेथे कोणताही विकास होण्याची शक्यता नाही. पालिका क्षेत्रात हरित पट्ट्यात एकरी 180 चौरस मीटर बांधकामाला परवानगी आहे.

पालिका जागा ताब्यात घेताना जमिन मालकांना पूर्ण जमिनीचा टी डी आर देणार असल्याने जमिन मालकांना फायदा होईल असा विश्वास आयुक्त वेलारसू यांना आहे. या टी डी आर चा वापर पालिका क्षेत्रात करता येईल. या प्रकल्पासाठी जमीन संपादनास काही अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने भू संपादन केले जाईल. या परिस्थितीत जमिन मालकांना सरकारी नियमानुसार मोबदला दिला जाईल असेही वेलारसूंनी स्पष्ट केले.  रोडच्या डोंबिवली ते दुर्गाडीच्या टप्प्यातील अडचणी नजिकच्या काळात दूर होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

जमिन मालकांना पालिकेत चकरा माराव्या लागू नयेत म्हणून या प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना किंवा प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांना भरपाई देण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. 

Web Title: Marathi news kalyan news ring road planning land for ring road