कल्याण पूर्व मध्ये तणाव पूर्व शांतता

Kalyan
Kalyan

कल्याण : भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात बुधवारी (ता. 3) कल्याण पूर्व पश्चिममध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखा वरील भ्याड हल्ला झाला तर कल्याण पूर्व मधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांवर अमानुष पोलिसांचा लाठी चार्ज आणि काहींना केलेली अटक केल्याच्या निषेर्धात आज गुरुवारी (ता. 4) सकाळी 10 च्या सुमारास  कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर मधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण पूर्व मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. 

भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 3) भिमसैनिकांनी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी आंदोलने केली. यात कल्याण पश्चिम मधील शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखेवर हल्ला करत कार्यालयाच्या बोर्डाची तोडफोड केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. याच कालावधीत कल्याण पूर्व मधील मराठा कोळशेवाडी शाखेजवळ शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक जमा होऊ लागले. दरम्यान शिवाजी कॉलनी, आनंदवाडी आणि जुना जनता सहकारी बँक परिसरात दोन गट आमने सामने येत घोषणाबाजी करत होते. यावेळी तणाव पाहता पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 26 जणांना पोलिसांना ताब्यात घेतल्याने संतापाचे वातावरण होते. 

शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज (ता. 4) कल्याण पूर्व मध्ये चिंचपाडा, कोळशेवाडी, चक्कीनाका, पूनालिंक रोड आदी परिसरातील सकाळी दुकाने बंद करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार बालाजी किणीकर, शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक निलेश शिंदे, प्रकाश पेणकर, माजी नगरसेवक अरविंद्र मोरे, हर्षवर्धन पालांडे, रवी कपोते, विजया पोटे, दीपेश म्हात्रे, आदी सहित कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ टिटवाळा बदलापूर शेकडो शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी वर्गाने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात घोषणाबाजी मुळे तणावाचे वातावरण 

सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर हे डोंबिवली मधील भाजपाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्तक असून त्यांच्या इशाऱ्याने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकावर हल्ला केल्याचा आरोप शिवसेना कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी केला असून आमच्या पध्दतीने समाचार घेणार असल्याचा इशारा दिल्याने भाजपा विरुद्ध शिवसेना मधील राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

शिवसेना शाखेवरील हल्ले म्हणजे शिवसैनिक आणि भीमसैनिक मध्ये दुरावा, तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे, त्यामुळे शांत होतो. परंतु पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि चिंचपाडा आणि सिद्धार्थ नगर मध्ये जी दंगल झाली तेथे कारवाई न करता स्व संरक्षणार्थ शिवसैनिक कोळशेवाडी शाखेवर असताना पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला, हल्ला केला, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी नाहक वातावरण बिघडविले, तेथे शिवसैनिकांवर हल्ला केला, यामुळे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांचा आम्ही निषेध करत असून वाडेकर यांनी स्थानिक पोलिसांचे न ऐकता शिवसैनिकांना अटक केली दोन समाजात तेढ निर्माण केलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांना निंलबन करत नाही तो पर्यंत शिवसेना आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला. 

कल्याण पूर्व मधील सिद्धार्थ नगर, मराठा कोळशेवाडी, आनंदवाडी परिसरात बुधवारी तणाव असल्याने गुरुवारी (ता. 4) सकाळ पासून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता तर दुकाने कडकडीत बंद होती सायंकाळी 5 नंतर तुरळक दुकाने सुरू झाल्याने तेथील हळूहळू जनजीवन सुरळीत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com