कल्याणमध्ये भीमसैनिकांचे चक्का जाम आंदोलन

रविंद्र खरात 
बुधवार, 3 जानेवारी 2018

कल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 

कल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 

कल्याण पूर्व सहित कल्याण पश्चिम मधील दुकानदार, व्यापारी, हॉटेल, शाळा, कॉलेज बंद राहिल्याने सकाळ पासून रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. सकाळी साडेनऊ पासून कल्याण पूर्व मधील भिमसैनिकांनी रस्त्यावर उतरत वाहतूक, दुकान बंद करत धडक मोर्चा काढला. चिंचपाडा, काटेमानवली नाका, सिद्धार्थ नगर व्हाया स्कायवाक वरून दिपक हॉटेल आणि शिवाजी चौकात नंतर पत्रिपुल मार्गे पुन्हा कल्याण पूर्वेला जाऊन चक्का जाम आंदोलन केले. 

मोर्चा आंदोलन करण्याऐवजी भिमसैनिकांनी शहरातील दिपक हॉटेल, शिवाजी चौक, वलीपीर रोड, पत्रीपूल, चक्कीनाका, वालधुनी पूल, परिसरात उतरत 4 तासाहून अधिक काळ रस्ता रोखून धरला होता. यामुळे सर्व सामान्य वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. 

कल्याणातील कल्याण-आग्रा रोड, कल्याण-मुरबाड-नगर, कल्याण- भिवंडी-नाशिक महामार्गावरील रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. एपीएमसी मार्केट पत्रीपूल नजीक एसटीच्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. तर केडीएमटी बसची तोडफोड कल्याण नाक्यावर झाली होती. कल्याण रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या व कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक रोखून धरले तर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. कल्याण शिवसेना मध्यवर्ती शाखेवर संतप्त जमावाने दगड फेक करीत शाखेच्या बोर्डची तोडफोड केली.

फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या नागरीकांना चोप 
पौर्णिमा चौक परिसरात अचानक चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर ते चित्रीकरण करणाऱ्या वाहन चालकांना आंदोलनकर्त्यांनी चांगलाच चोप दिला त्यामुळे काही तणावाचे वातावरण होते यामुळे अनेकांच्या मोबाईल फोडल्याने चांगलेच नुकसान झाले. 

कल्याण शिवसेना मध्यवर्ती शाखेवर संतप्त जमावाने दगड फेक करीत शाखेच्या बोर्डची तोडफोड केली, या घटनेचा निषेध शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी केला असून आरोपीना त्वरित अटक न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने समाचार घेईल असा इशारा भोईर यांनी दिला आहे. 

दुकान, कार्यालय, शाळा, कॉलेज बंद असले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या या चक्का जाम आंदोलनामुळे सर्व सामान्य नागरीकांना चांगलाच मनस्ताप करावा लागला तर एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्येच उतरून पायी चालत जाऊन प्रवास करावा लागला तर पत्रिपुल जवळील काही काळ रेल रोको आंदोलन केल्याने प्रवाशांना पायी चालत जावे लागले .

 

Web Title: Marathi news kalyan news strike in kalyan