वृक्षतोडीसंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीने धोरण तयार करावे : आयुक्त पी. वेलारसू

सुचिता करमरकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीने धोरण तयार करावे, अशी सूचना पालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी आज केली. समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. 

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीने धोरण तयार करावे, अशी सूचना पालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी आज केली. समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. 

बहुचर्चित माणकोली मोठागाव ठाकुर्ली दरम्यानच्या पुलाच्या कामात बाधित होणारी 65 झाडे तोडणे. तसेच त्यांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पालिकेकडे मागितली आहे. याबाबत काही हरकती आल्या आहेत का? त्यांची सुनावणी किंवा त्यांचे निराकरण झाले आहे का? अशी माहिती आयुक्तांनी मागितली. मात्र, अशी कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याने या विषयाला स्थगिती देण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला.

'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'नेही अशाचप्रकारे 647 झाडे तोडणे. तसेच पुनर्रोपण करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांच्या या परवानगी पत्राबरोबरच संबंधित विभागाने हरकतींचे निराकरण केल्याचे पत्रही पालिकेला पाठवले आहे. या विषयाला त्वरित मंजुरी देण्यात आली. आयुक्तांनी अशा वृक्ष तोडण्याच्या विषयासंदर्भात एक धोरण ठरवून त्याला सरकारच्या कृषि विभाग, हॉर्टीकल्चर विभागाच्या नियमावलीचा आधार घ्यावा, अशा सूचना केल्या.

समितीने धोरण ठरवल्यावर त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज असल्यास पालिका प्रशासन तशी कार्यवाही करेल, अशी माहिती बैठकीनंतर आयुक्त वेलारसू यांनी दिली. 

Web Title: marathi news kalyan news tree cutting policy should be formed