कल्याण - पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती

सुचिता करमरकर
बुधवार, 7 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वीही असा अयशस्वी प्रयत्न पालिकेने केला आहे. मात्र यावेळी त्याला यश मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. ही योजना प्रत्यक्ष सुरु होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे. याचाच अर्थ डंपिंग ग्राउंडमुक्त शहरासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

2005-2006 मधे पालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या योजनेचा विचार केला होता. हैदराबादच्या एका कंपनीला याचा ठेका दिला गेला होता. मात्र यात पुढे काहीच प्रगती झाली नाही. त्यानंतर कचरा प्रश्नावर पालिकेसमोर अनेक अडचणीत आल्या. न्यायालयाने पालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर ताशेरेही ओढले. त्यानंतर आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या उद्देशाने पालिकेने कचरा विघटनासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या. शास्त्रोक्त भूमी भराव तसेच बायो गॅस या त्यापैकीच आहेत. यावरील कामे सध्या प्रगती पथावर आहेत. याचबरोबर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेने प्रस्तावित केला आहे. दिल्ली, नागपूर तसेच मध्य प्रदेशात यापूर्वीच या प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड पालिकाही हा प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. 

पाचशे मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार नाही. शहरातून जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा वीजनिर्मितीसाठी जाळला जाईल. त्यातून कचऱ्याच्या वजनाच्या दहा ते पंधरा टक्के राख निर्माण होईल. शंभर टन कचऱ्यापासून एक मेगा वॅट वीज निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. ही वीज पॉवरग्रीडमधून पालिका विकत घेणार आहे. उंबर्डे येथे हा प्रकल्प उभारला जाईल. तर त्यातून तयार होणारी राख मांडा येथे टाकली जाईल. या राखेच्या वीटा बनवल्या जातील. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यापासून पर्यावरण विभागाची मान्यता मिळून काम सुरु होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागणार आहे. कल्याण डोंबिवली शहरातील संपुर्ण कचरा या प्रकल्पात वापरला जाईल. मात्र परिसरातील अन्य संस्थाही आपला कचरा यासाठी उपयोगी ठरु शकतो.  दिल्लीत या प्रयोगाला यश मिळाले असले तरीही कल्याण डोंबिवली शहरात याचे भवितव्य काय असेल ते येणारा काळच ठरवेल. 

Web Title: Marathi news kalyan news waste in the area of municipal corporation electricity