जागतिक महिला दिनानिमित्त महिला रिक्षा चालकाचा सत्कार

रविंद्र खरात 
गुरुवार, 8 मार्च 2018

कल्याण : जागतिक महिला दिनानिमित्त टॅक्सी रिक्षा चालक मालक असोसिएशन आणि कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने महिला रिक्षा चालक आणि महिला पोलीस यांचा सत्कार करण्यात आला. 

कल्याण : जागतिक महिला दिनानिमित्त टॅक्सी रिक्षा चालक मालक असोसिएशन आणि कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने महिला रिक्षा चालक आणि महिला पोलीस यांचा सत्कार करण्यात आला. 

महिला पोलीस आपल्या अनेक अडचणीला बाजुला सारून जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र बंदोबस्त पथकात काम करत आहेत तर महिला रिक्षा चालकही स्पर्धेत टिकून राहत रिक्षा व्यवसाय करत असते, म्हणून जागतिक महिला दिना निमित्त आज सकाळी महिला रिक्षा चालक कल्पना वाघमारे आणि महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, टॅक्सी रिक्षा चालक मालक असोसिएशनचे संतोष नवले, बापू चतुर, जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Marathi news kalyan news womens day woman auto rickshaw driver