आठ जीव वाचविणाऱ्या हवालदार शिंदेंना रितेशचा सलाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

शिंदे यांच्या कामगिरीवर अभिमान व्यक्त करत अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे रितेशने सुदर्शन शिंदे यांच्या शौर्याला सलाम दिला आहे. 

मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेली आग सरत्या वर्षातील अत्यंत दुर्दैवी अशी आपल्या सगळ्यांच्याच मनाला चटका देउन जाणारी घटना आहे. अशा दुर्घटना घडल्यानंतर खरा कस लागतो तो सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचा. मुंबई पोलिसांच्या तत्परतेविषयी कायमच आपण ऐकत आलो आहोत. अशीच तत्परता हवालदार सुदर्शन शिंदे यांनी कमला मिलच्या दुर्घटनेतील 8 लोकांचा जीव वाचवून दाखवली आहे.

सोशल मिडीयावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्या फोटोत हवालदार शिंदे आपल्या खांद्यावर एका महिलेला उचलून कमला मिल परिसराच्या बाहेर घेउन येत आहेत. घटनेच्या तिव्रतेविषयी शिंदे यांनी सांगितले की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे खुप धुर दाटला होता. फायर ब्रिगेडला मदत म्हणून त्यांनी पायऱ्यांकडे धाव घेतली. जिथे जखमी मिळाले अशांना त्यांनी खांद्यावर उचलून परिसराच्या बाहेर आणले. सुदर्शन शिंदे हे वरळी पोलिस ठाण्यात हवालदार आहेत.

शिंदे यांच्या कामगिरीवर अभिमान व्यक्त करत अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे रितेशने सुदर्शन शिंदे यांच्या शौर्याला सलाम दिला आहे. 

लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 28 तारखेच्या रात्री आग लागली होती. ज्यात 14 जणांचा होरपळून मृत्यु झाला.    

 

Web Title: Marathi News kamla mills constable sudarshan shinde photo viral social media