..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे

विजय गायकवाड
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई : राज्य सरकारवर  कठोर प्रहार करणारे माजी मंत्री  एकनाथ खडसेंनी 'किसान लॉंग मार्च'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. किसान लॉंग मार्चला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारदरबारी प्रचंड दबाव वाढला आहे.

विधिमंडळाच्या सोमवारच्या  कामकाजावर मोर्चाचा प्रभाव होता. मंत्रिपद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरुन खडसे अस्वस्थ आहेत. त्यामळे ते सरकारवरील टीकेची एकही संधी सोडत नाही.

यांसदर्भात 'सकाळ'शी बोलताना खडसे म्हणाले, 'नाशिकचे असल्यामुळे जीवा गावित हे सगळे ओळखीचे नेते आहेत. एकमेकांच्या घरी जेवण होतं, चर्चा होतात. शेतकरी मोर्चाबाबत कळलं तेव्हा मी मोर्चेकरी नेत्यांशी बोललो होतो. मोर्चकरी म्हणाले होते सरकारने लिहून द्यावं मागण्यांबाबत काय कारवाई करणार. आम्ही आंदोलन मागे घेतो.''

''मी इथे चार पाच दिवस आधी सरकारशी बोललो होतो. चर्चा करा त्यांच्याशी त्यांना लिखित हवे; परंतु सरकारच्या वतीने काहीच केले नाही,'' असा खडसेंचा आरोप आहे.

नाशिकचे पालकमंत्री आणि संबंधितांनी आधीच प्रयत्न केले असते तर कदाचित  आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात खडसेंनी खंत  व्यक्त करुन  मंत्री गिरीष महाजन यांना लक्ष केले.

किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक रविवारी काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. समितीत मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख या मंत्र्यांचा समावेश आहे. हे ' शेतकरी -मंत्री' आता शेतक-यांना कसा न्याय देतील हे पाहू   अशी उपरोधिक टीका एकनाथ खडसेंनी केली.

Web Title: marathi news Kisan Long March Mumbai Eknath Khadse