दिवाळीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचे 'थोडी खुशी..थोडी गम'

Marathi news Latest Marathi News Uddhaw Thackeray GST
Marathi news Latest Marathi News Uddhaw Thackeray GST

GST बद्दल नाराज; अंगणवाडी सेविकांच्या निर्णयाबद्दल समाधानी

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील टीकेची धार सौम्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) दोन्ही सरकारांना काही 'सूचना' केल्या, काही सल्ले दिले आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. 

मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या पक्षाबद्दल आणि राणे यांच्याबद्दल बोलणे टाळले. राणे एनडीएमध्ये लवकरच सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. 

गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मांडलेले तीनपैकी दोन विषय मार्गी लागले याबद्दल राज्य सरकारचे कौतूक उद्धव यांनी केले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाल्याबद्दल आणि रेल्वेच्या फुट ओव्हर ब्रीजवरील फेरीवाले हटविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उद्धव यांनी सरकारबद्दल समाधान व्यक्त केले. 

जीएसटीमध्ये केंद्र सरकारने काल केलेल्या कर कपातीच्या घोषणांबद्दल उद्धव फारसे समाधानी नाहीत. 'केंद्र सरकारने सर्वसमान्यांकडून लक्ष्मीच लुबाडली आहे. करावरती कर लादले जात आहेत. कालच्या घोषणा ही दिवाळी भेट नाहीय. हा सरकारचा नाईलाज आहे,' असे सांगत त्यांनी जनतेतील असंतोषाची दोन्ही सरकारांनी दखल घेतली पाहिजे, असा सूर लावला. 

आजची पत्रकार परिषद तमाम जनतेला भेडसावणाऱया प्रश्नांसाठी घेतलेली आहे, असे सांगून उद्धव म्हणाले, जनतेने चांगले बदल घडविण्यासाठी आपल्याला मते दिलेली आहेत. ते बदल घडलेच पाहिजेत. 

लोक सरकार विरोधात बोलायला लागली आहेत; याचे रुपांतर असंतोषात होण्याआधी सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये कपात केली पाहिजे. राज्यातील जनतेला भारनियमनाचे चटके बसत आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा सूचना उध्दव यांनी केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com