मुंबईच्या साकीनाका परिसरात दुकानाला भीषण आग ; 12 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

रुग्णालयात सकाळी 12 मृतदेह आणण्यात आले होते. त्यानंतर जखमी किंवा मृत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. मात्र, आम्ही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत

(डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक)

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका मिठाईच्या दुकानाला आज (सोमवार) सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

साकीनाका परिसरातील भानू फरसाण या मिठाईच्या दुकानाला आग लागली. या आगीमुळे दुकानाचा काही भाग कोसळला. गाळा क्रमांक 1 मध्ये ही भीषण आग लागली. या आगीमुळे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील भाग ढिगाऱ्याखाली 18 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यातील 11 जणांना बाहेर काढण्यात आले असून, आणखी 4 जण अडकले आहेत. यातील सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

''रुग्णालयात सकाळी 12 मृतदेह आणण्यात आले होते. त्यानंतर जखमी किंवा मृत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. मात्र, आम्ही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत'', अशी माहिती राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.  

Web Title: marathi news local Mumbai 10 People Dead In A Fire That Broke Out At A Shop On Khairani Road In Mumbai In The Early Morning Hours

टॅग्स