कमला मिल आगप्रकरणातील तिसरा मालकही अटकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबईतील कमला मिल परिसरातील 'वन अबव्ह' आणि 'मोजो बिस्ट्रो' या पबमध्ये 29 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. 

मुंबई : कमला मिल परिसरातील इमारतीला लागलेल्या आगप्रकरणात 'वन अबव्ह' पबचा तिसरा मालक अभिजीत मानकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी वन अबव्ह पबचे मालक कृपेश सिंघवी आणि जिगर सिंघवी या दोघांना अटक केली. त्यानंतर आता अभिजीत मानकरलाही पोलिसांनी अटक केली.  

मुंबईतील कमला मिल परिसरातील 'वन अबव्ह' आणि 'मोजो बिस्ट्रो' या पबमध्ये 29 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीच्या घटनेनंतर वन अबव्ह पबचे मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी आणि अभिजीत मानकर या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पबमालक जिगर सिंघवी आणि कृपेश सिंघवी या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता पबचा तिसरा मालक अभिजीत मानकरला पोलिसांनी अटक केली.    

दरम्यान, कमला मिल कंपाऊंडमधील दुर्घटनेप्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक याला न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
 

Web Title: marathi news local news Kamala Mills Fire Owners Of 1Above Pub Arrested By Mumbai Police