मागोवा 2017 सालचा ; पालघर जिल्ह्याचे एक पाऊल यशस्वीतेकडे

भगवान खैरनार
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मोखाडा : पालघर जिल्हा निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने तीन वर्षानंतर विकास कामांची सुरवात 2017 मध्ये झाल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. कुपोषणग्रस्त आणि बालमृत्यूच्या घटनांनी गाजलेला जिल्ह्यात कुपोषणाचा आणि बालमृत्यूचा आलेख खाली आला आहे. 

जिल्हा मुख्यालयाकडे येणार्‍या रस्त्यांच्या रुंदीकरणासह दोन नव्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 2017 सालात पालघर जिल्ह्याचे एक पाऊल यशस्वीतेकडे पडले असल्याचे दिसून आले आहे. मात्र, ग्रामीण भागाला रोजगार निर्मितीबाबत न्याय मिळाला नसल्याची खंत कायम आहे. पालघर जिल्ह्याचा 2017 चा मागोवा घेतल्यास प्रामुख्याने विकास कामांना मंजुरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाल्याची ठळक घटना समोर येते. 

आदिवासी केंद्रबिंदू समोर ठेऊन निर्माण केलेल्या पालघर जिल्हयात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण मोठया प्रमाणावर होते. सन 2017 मध्ये त्यांना आळा घालण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली. त्याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी घेतला आहे. अमृत आहार योजना, ग्राम बालविकास केंद्रे, अंडी, केळीचा पूरक पोषण आहार गरोदर माता आणि कुपोषित बालकांना दिल्याने पालघर जिल्ह्यातील कुपोषणाला आळा बसल्याचे दिसून आले आहे.

कॉर्पेारेट जगत, सामाजिक संस्था, नामांकित रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी घेतलेल्या आरोग्य शिबिरे व वेळोवेळी केलेल्या तपासणीत बालमृत्यू दर 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे सरकारी अहवालात नमूद केले आहे.

Web Title: marathi news local palghar news 2017 year works