वंचित घटकांना अर्थसंकल्पात न्याय

विजय गायकवाड
रविवार, 11 मार्च 2018

संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड आणि ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची घोषणा आणि तरतुदीचे सामाजिक स्तरातून स्वागत होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या मर्यादा असल्या तरी बजेटआधी सर्व घटकांचे प्रतिनिधी आपल्या मागण्यांचे निवेदन अर्थमंत्र्यांकडे सादर करत असतात. अनेक वेळा मोठा दबाव आणि वजन असलेल्या भांडवलदार वर्गाच्या मागण्या सहज मान्य होतात.

 

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वंचितांच्या मागण्यांना अर्थसंकल्पामधून न्याय देताना एकात्मिक विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी 10 कोटींची तरतूद केली आहे; तर महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हस्तकला समूह विकासासाठी चार कोटी आठ लाख आणि काथ्या उद्योगासाठी 10 कोटींची तरतूद करून असंघटित वंचित घटकाला न्याय दिल्याची भावना सर्वसामान्य वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड आणि ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची घोषणा आणि तरतुदीचे सामाजिक स्तरातून स्वागत होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या मर्यादा असल्या तरी बजेटआधी सर्व घटकांचे प्रतिनिधी आपल्या मागण्यांचे निवेदन अर्थमंत्र्यांकडे सादर करत असतात. अनेक वेळा मोठा दबाव आणि वजन असलेल्या भांडवलदार वर्गाच्या मागण्या सहज मान्य होतात. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही बजेटमधील या रचनेत बदल झाला नाही. राज्यातील कुंभार समाजाने सामाजिक आरक्षणासह आपल्या न्याय्य मागण्यांसाठी विधिमंडळावर मोर्चा काढला होता. त्यांच्या अनेक मागण्यांपैकी एका मागणीला अर्थमंत्र्यांनी न्याय दिला आहे. 

राज्यातील ऑटो रिक्षाचालकांचे ग्राहकांना भले-बुरे अनुभव असले तरी राज्यातील 20 लाख ऑटो रिक्षाचालकांसाठी खूशखबर सुधीरभाऊंनी दिली आहे. महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऑटो रिक्षाचालकांच्या अडचणींचे निरकारणासाठी हक्काचे व्यासपीठ महामंडळाच्या रूपाने स्थापले जाणार आहे. हस्तकला समूह विकासासाठी चार कोटी आठ लाख आणि काथ्या उद्योगासाठी 10 कोटींची तरतूद करून असंघटित वंचित घटकाला न्याय दिल्याची भावना सर्वसामान्य वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Marathi News Maharashtra News Budget Justice For People