रात्रशाळेत शिक्षकांना हकलणाऱ्या मुख्याध्यापकांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - पहिल्याच दिवशी रात्रशाळा बंद करण्याचा घाट घालणाऱ्या मुख्याध्यापकांना प्रकरण चांगलेच भोवणार आहे. शिक्षण विभागाच्या सरकारी आदेशाला विरोध करण्यासाठी रात्रशाळेत पाठवलेल्या शिक्षकांना काही मुख्याध्यापकांनी परत पाठवले. काहींनी शाळेबाहेर टाळे लावत शाळेत विद्यार्थीच नसल्याचा दावा करत समायोजित शिक्षकांना परत पाठवले. नियमबाह्य वर्तणूक केल्याप्रकरणी या शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची स्पष्टोक्ती मुंबई विभागीय शिक्षक उपसंचालक विभागाने घेतला आहे.

रात्रशाळेविषयी मे महिन्यात जाहीर झालेल्या सरकारी आदेशानंतर शिक्षक संघटनांमध्ये फूट पडली आहे. काही शिक्षक संघटनांनी रात्रशाळेतील शिक्षकांना सर्वसुविधा मिळणार असल्याचे स्वागत केले तर काहींनी या आदेशामुळे दिवसा शाळेत शिकवणा-या शिक्षकांना रात्रशाळेत शिकवण्यासाठी मज्जाव केल्याने विरोध केला. या दोन्ही संघटनांपैकी सरकारविरोधी शिक्षक संघटनांनी रात्रशाळा बंद केल्यास 14 जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलनाच्याऐवजी शाळेच्या पहिल्याच दिवशी समायोजित शिक्षकांना रात्रशाळेत प्रवेशच न देण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. दिवस शाळेतून अतिक्ति ठरलेल्या शिक्षकांना रात्रशाळेत समाविष्ठ केले आहे. मात्र समायोजित शिक्षकांना सरसकट शाळेबाहेरुन काही मुख्याध्यापकांनी परत पाठवले. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याने अशा प्रकारे शिक्षकांना परत पाठवून आंदोलन करणा-या मुख्याध्यापकांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आंदोलनामागे राजकीय इच्छाशक्ती
मुंबईत रात्रशाळा बंद होणार आहेत, असे पसरवून मुख्याध्यापकांना घाबरवणा-या संघटनांचा केवळ राजकारण करण्याचा हेतू आहे. आगामी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक लक्षात घेत ही स्टंटबाजी केवळ रात्रशाळेवर उदरनिर्वाह चालवणा-या शिक्षकांवर अन्यायकारक असल्याची टीकाही शिक्षक परिषदेने केली. या प्रकरणी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले जाणार असून शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी मदत करण्याची विनंती केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू, शिवनाथ दराडे, अनिल बोरनारे, दर्शना पांडव यांनी सांगितले. गेल्या वर्षीही काही रात्रशाळा बंद पडल्या होत्या, बंद पडलेल्या रात्रशाळांमधील विद्यार्थी शिक्षकांबाबत शिक्षक भारती संघटनेने तेव्हा का चुप्पी साधली, असा सवालही दर्शना पांडव यांनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news maharashtra news night school action against headmaster