मॅनहोल्स बंद करण्याच्या कार्यवाहीचा तपशील द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - शहर आणि पूर्व व पश्‍चिम उपनगरांमधील खुली मॅनहोल्स बंद करण्याबाबत सुरू केलेल्या कार्यवाहीचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महापालिकेला दिले. 

मुंबई - शहर आणि पूर्व व पश्‍चिम उपनगरांमधील खुली मॅनहोल्स बंद करण्याबाबत सुरू केलेल्या कार्यवाहीचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महापालिकेला दिले. 

गतवर्षी पावसाळ्यात उघडलेल्या गटाराच्या झाकणामुळे मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध डॉक्‍टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर न्या. शंतनु केमकर आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेत डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्याबाबत घडलेला पक्रारप्रकार भविष्यात घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरातील सुमारे १५०० धोकादायक मॅनहोल्स लोखंडी ग्रील आणि अन्य पद्धतीने बंद करण्यात येणार आहेत, याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे भविष्यात मॅनहोलमध्ये पडून अपघात घडणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने ॲड. अनिल साखरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. 

महापालिकेकडून कोणतीही मॅनहोल्स खुली ठेवली जात नाही; मात्र पूरपरिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडूनच गटाराचे झाकण उघडून मॅनहोल्स खुली केली जातात, महापालिकेचे कर्मचारी तसे प्रकार करीत नाहीत; असेही ॲड. अनिल साखरे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

Web Title: marathi news Manholes court mumbai