दहीहंडी निर्बंधांच्या काळात अपघातात कमालीची घट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसताना मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते, परंतु उंचीवर निर्बंध घातल्यानंतरच्या तीन वर्षांत गोविंदांच्या अपघातांमध्ये कमालीची घट झाली होती, अशी माहिती याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी सोमवारी (ता. 7) दिली. 

राज्य सरकारने 20 फुटांहून अधिक उंचीच्या दहीहंड्या बांधण्यास परवानगी दिल्यास गोविंदांच्या सुरक्षेसाठी आपण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. 

दहीहंडी उत्सवात गोविंदांना होणाऱ्या अपघातांना आळा बसावा आणि बालगोविंदांमार्फत दहीहंडी फोडू नये यासाठी स्वाती पाटील लढा देत आहेत. 2014 मध्ये दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा अधिक असू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती, परंतु आता पुन्हा उंचच उंच हंड्या बांधल्या जातील आणि अपघातांना आमंत्रण मिळेल, अशी भीती स्वाती पाटील व्यक्त करतात.

दरवर्षी दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांची माहिती आम्ही माहिती अधिकारातून मिळवली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 
दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उच्च न्यायालयाने हटवले असून त्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णायानुसार 14 वर्षांवरील गोविंदांना दहीहंडी फोडता येईल. 

जखमी गोविंदा (केईएम रुग्णालय) 

वर्ष गोविंदा 
2011 250 
2012 190 
2013 200 
2014 122 
2015 97 
2016 सराव करताना- 6 
दहीहंडी फोडताना- 30 

Web Title: marathi news marathi website Mumbai news Dahi Handi Mumbai High court Supreme Court