कल्याण: भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मिळणार मदत 

रविंद्र खरात
गुरुवार, 20 जुलै 2017

कल्याण : तालुक्‍यातील म्हारळ गावात अतिवृष्टीमुळे रविवारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत लवकरच दिली जाईल, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांनी 'सकाळ'ला दिली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी पहाटे पाच वाजता अतिवृष्टीमुळे म्हारळमध्ये घराची भिंत कोसळली. यात सैफुद्दीन अल्लाऊद्दीन खान (वय 45) आणि इस्लाम निजामुद्दीन शेख (45) यांचा मृत्यू झाला; तर परवेश बन्सलराज सिंग (26), फिरफोस इस्लाम महंमद शेख (38), खुशबू सैफुद्दीन शेख (16), नीलम प्रवेश सिंग (28) हे जखमी झाले. त्यांच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या 11 वर्षांच्या सोना महंमद इस्लाम शेख या मुलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तहसीलदार कार्यालयामार्फत या दुर्घटनेचा अहवाल बनवून मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांसाठी आठ लाख रुपयांचा मदतनिधी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. 'मयतांच्या वारसांची ओळख पटवून हा निधी त्यांना दिला जाईल', असे अमित सानप यांनी सांगितले. 

Web Title: marathi news marathi website mumbai news Kalyan News