तब्बल एक वर्षानंतर कल्याणमध्ये नागरी सुविधा केंद्राचे उद्‌घाटन 

रविंद्र खरात
बुधवार, 26 जुलै 2017

कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश यामुळे पालिकेचे प्रभाव क्षेत्र कार्यालयाचा विभाजन केल्यानंतरही तब्बल एक वर्षानंतर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू झाले आहे. यासंदर्भातील बातमी 'ई सकाळ'वर 13 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

कल्याण पूर्वमध्ये याआधी केवळ पालिकेचे 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय होते. वाढती लोकसंख्या आणि 27 गावांचा समावेश पाहता पालिकेने प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. कल्याण पूर्वमध्ये लोकग्रामच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने प्रभाग क्षेत्र कार्यालय बनविण्यात आले होते. पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत 13 वॉर्ड आहेत. येथील लोकसंख्या अंदाजे दीड लाख आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येच हे कार्यालय सुरू झाले होते. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. 

नागरी सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनावेळी महापौरांसह पालिकेतील शिवसेनेचे गटनेता रमेश जाधव, प्रभाग समिती सभापती सुमन निकम, नगरसेवक निलेश शिंदे, दशरथ घाडीगावकर, माजी नगरसेवक नितीन निकम, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले, भारत पवार, पालिका सचिव संजय जाधव आणि जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर उपस्थित होते. 

Web Title: marathi news marathi website mumbai news kalyan news