डोंबिवली: वायू प्रदुषणाच्या तक्रारीत पुन्हा वाढ

सुचिता करमरकर
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

कल्याण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीत वायू प्रदुषण होत असल्याच्या तक्रारीत पुन्हा वाढ झाली आहे.  प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मात्र अशा कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचा खुलास मंडळाच्या डी बी पाटील यांनी केला आहे. 

डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील अभिनव शाळेजवळ, गणपती विसर्जन तलावाजवळ, गांधीनगर, व्यंकटेश पेट्रोल पंप परिसर या ठिकाणी अत्यंत उग्र दर्प पसरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. तीस जुलै, एक ऑगस्ट तसेच त्यानंतरही हा वास येत होता. याबाबत मंडळाच्या कार्यालयात तक्रारीसाठी फोन केला असता लेखी तक्रार करा असे सांगितले केले.

सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कवी याविषयात बोलताना म्हणाल्या कि, मला मागील काही दिवसांपासून उग्र वास येत असल्याचे फोन येत आहेत. शनिवारी ( पाच ऑगस्ट रोजी मंडळाच्या कार्यालयात फोन केला असता दोन दिवस सर्व संबंधित रजेवर असून मंगळवारी फोन करा असे सांगण्यात आले. औद्योगिक परिसरातील काही कारखाने बंद असल्याचे बातम्यांमधून समजले होते. त्यामुळे हे वास नेमके कुठून येतात याची चौकशी झाली पाहिजे, असेही कवी म्हणाल्या. वास येत असताना तक्रार केली असता अधिकारी विलंबाने पोहोचतात.  तो वास कायम स्वरुपी रहात नसल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अशा कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचा खुलास मंडळाच्या डी बी पाटील यांनी केला आहे. या परिसरावर आमची नजर असून क्या काही प्रक्रार घडल्यास त्वरित कारवाई केली जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news marathi website mumbai news mumbai air pollution