'विद्यार्थी भारती'चे कुलगुरू 'चले जाव' आंदोलन सुरू

प्रमोद पाटील
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर 'कुलगुरू राजीनामा द्या', 'शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाचा बापाचे', 'कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय', 'मुलांच्या भविष्याशी खेळणारे कुलगुरू मुर्दाबाद' अशा अनेक घोषणाबाजीने गजबजले होते.

मुंबई विद्यापीठाचा निकाल 45 दिवसात लावण्याचा नियम असतांनाही तीन महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात येत नाही. त्यामुळे किती तरी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असूनही कुलगुरू कोणतेही ठोस असे पाऊल उचलत नसल्याचे विद्याथी भारती राज्यद्यक्षा विजेता भोनकर यांनी म्हटले.

पूनर्मुल्यांकनाचा निकाल लावण्यासाठी जी जुलमी व जाचक फी आकारण्यात येते. ती रद्द करून विद्यार्थ्यांना सात दिवसांच्या आत मोफत निकाल लावून द्यावे असे राज्यकार्यवाह स्मिता साळुंखे यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावून जो काही मनमानी कारभार कुलगुरू करत आहे त्याबद्दल कुलगुरूनी स्वतःहून राजीनामा देण्यात यावा असे राज्य प्रवक्ता स्वप्नील तरे यांनी म्हटले.

आज मुंबई विद्यापिठात झालेल्या आंदोलनानंतर कुलगुरूंना शिष्टमंडळ भेटायला घेल्यास आणखी 14 ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाही असे कुलगुरूंनी म्हटले असल्याचे विद्यार्थी भारती कोकण अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी म्हटले आहे.

विद्यापीठ जो काही भोंगळ कारभार चालवते त्या निषेधार्थ मुंबई किर्ती महाविद्यालयात, सिद्धार्थ, अग्रवाल कॉलेज ,सी.एच.एम. कॉलेज , आशा अनेक महाविद्यालयात आज विद्यार्थी भारती तर्फे काळा दिवस ही पाळण्यात आल्याचे विद्यापीठ आद्यक्ष ज्योती निकाळजे यांनी म्हटले.

पुढील 12 दिवसात निकाल न लागले गेल्यास विद्यार्थी भारती कुलगुरू चा बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचे विद्यापीठ कार्यदयक्ष मोनाली भोईर यांनी सांगितल्याचे विद्यापीठ प्रवक्ता मोरविक नन्नोरे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: marathi news marathi website Mumbai University Education