कल्याणमधील सोसायटीची प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी 

रविंद्र खरात
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील 'लोकवाटिका संकुल'मधील महिलांनी एकत्र येत प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संकल्प केला. तसेच, दसऱ्याच्या मुहूर्तापासून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीला सुरवात केली आहे. याचे प्रशिक्षणही त्या महिलांनी घेतले आहे. 

'लोकवाटिका संकुल'मध्ये साडेपाचशेहून अधिक कुटुंब राहतात. नवरात्रीनिमित्त गेल्या रविवारी सायंकाळी स्थानिक महिलांची बैठक झाली. त्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. 25 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत त्या परिसरातील महिलांनी 54 किलो प्लास्टिक पिशव्या 'सहयोग' या सामाजिक संस्थेकडे जमा केल्या आहेत. 

या उपक्रमासाठी 'लोकवाटिका संकुल'मधील 25 ते 30 कुटुंबांनी पुढाकार घेतला आहे. 'पर्यावरण आणि कचऱ्यापासून होणारा त्रास पाहून हळूहळू अन्य नागरिकही एकत्र येतील' अशी आशा 'सहयोग'चे अध्यक्ष विजय भोसले यांनी व्यक्त केली. भोसले यांच्यासह मुंबई मनपाचे अधिकारी प्रकाश दळवी यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले. 

'लोकवाटिका संकुल'मधील प्लास्टिक पिशवी बंदी करत ओला आणि सुका कचरा वेगळा करत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती बाबत प्रशिक्षणात सहभागी झालेले नागरिक.

Web Title: marathi news marathi websites Kalyan News Mumbai News Ravindra Kharat